Karmveer Bhaurao Patil University : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मान्यता

देशात आता समूह विद्यापीठे स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. या संकल्पनेच्या अंतर्गत सातारा येते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभारले जाईल.
Karmveer Bhaurao Patil University
Karmveer Bhaurao Patil UniversityAgrowon
Published on
Updated on

Pune News देशात आता समूह विद्यापीठे स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. या संकल्पनेच्या अंतर्गत सातारा येते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ (Karnveer BHaurao Patil Unevrsity) उभारले जाईल. या विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी (Chandrakant Dalavi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात पारंपरिक अशी कृषी व अकृषिक विद्यापीठे आहेत. त्यानंतर ‘डी. वाय. पाटील’, ‘भारती’ अशी अभिमत विद्यापीठे तयार झाली. विद्यापीठ संकल्पनेच्या विकासातील तिसरा टप्पा म्हणून आता समूह विद्यापीठेदेखील राज्यात उघडत आहेत. देशात पहिल्या टप्प्यात ११ समूह विद्यापीठे स्थापन झाली आहेत.

Karmveer Bhaurao Patil University
Indian Education : आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग

त्यातील दोन मुंबईत तर एक सातारा येथे आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या विद्यापीठाशी उत्तम शिक्षण दर्जा जोपासणारी ३ ते ५ महाविद्यालये जोडली जातील. त्यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याची संधी मिळेल.

Karmveer Bhaurao Patil University
Right To Education : ‘आरटीई’ प्रवेशासाठी आज निघणार सो़डत

कर्मवीर विद्यापीठासाठी अद्याप पूर्णवेळ कुलगुरूंची निवड झालेली नाही. त्यामुळे प्रभारी कुलगुरुपद सध्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे देण्यात आले आहे. समूह विद्यापीठ संकल्पनेत कुलगुरूपेक्षाही कुलाधिकारी पद वरिष्ठ समजले जाते.

कुलपती असलेल्या राज्यपालांनी कुलाधिकारीपदी श्री. दळवी यांची नियुक्ती केली. ७७५ शाखा असलेली ‘रयत’ ही देशातील सर्वात मोठी शिक्षण संस्था समजली जाते. त्यात साडेचार लाख विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण दिले जात आहे.

श्री. दळवी म्हणाले, ‘‘रयत’ने स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाली असून कर्मवीर भाऊराव विद्यापीठाची स्थापना झाली आहे.

त्याचे मुख्यालय सातारा येथे असेल. राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली एक स्वतंत्र निवड समिती लवकरच या विद्यापीठासाठी पूर्णवेळ कुलगुरू निवडेल.

या विद्यापीठाची पालक संस्था म्हणून रयत शिक्षण संस्था कार्यरत राहील. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मानांकनात ‘अ’ किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाची श्रेणी बहाल केलेली व स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना या विद्यापीठाशी जोडले जाईल.’’

राज्यात तळागाळात असलेल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे स्पर्धात्मक व्यासपीठावर आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी कर्मवीरांच्या वैचारिक बांधणीतून विद्यापीठ काम करेल.
- चंद्रकांत दळवी, कुलाधिकारी, कर्मवीर भाऊराव विद्यापीठ, सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com