Water Leakage of Girna Dam: जामदा डावा कालव्याच्या कामाला गती

गिरणा धरणाच्या कालव्यातून पाण्याची गळती होत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कालव्यांना काँक्रीटचे अस्तरीकरण करण्याची मागणी होती.
Water Leakage Of Girna Dam | Water Tank Leakage | Girna Dam
Water Leakage Of Girna Dam | Water Tank Leakage | Girna DamAgrowon

भडगाव, जि. जळगाव : गिरणा धरणाच्या (Girna Dam) कालव्यातून पाण्याची गळती (Canal Water Leakage) होत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कालव्यांना काँक्रीटचे अस्तरीकरण (Cana Lining) करण्याची मागणी होती. त्या पार्श्‍वभूमीवर खेडगाव ते शिवणी दरम्यान जामदा कालव्याच्या काँक्रिटीकरण लायनिंगच्या कामाला गती देण्यात आली आहे. या कामाची नुकतीच गिरणा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी पाहणी केली.

Water Leakage Of Girna Dam | Water Tank Leakage | Girna Dam
Rabi Irrigation : कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन सुरू करण्याची मागणी

पावसाळ्यात गिरणा नदीतील पुराचे पाणी पारोळा तालुक्यातील आवर्षणग्रस्त भोकरवाडी व म्हसवे धरणात सोडण्यात येते. यासाठी पावसाळा कालावधीत जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ते ऑक्टोबरपर्यंत कालवा प्रवाह सुरू होता. यानंतर मधला एक दीड महिन्याचा देखभाल, दुरुस्तीचा कालावधी संपल्यावर त्यानंतर तीन ते चार महिने शेती सिंचनाचे आवर्तन सुरू असणार आहे.

Water Leakage Of Girna Dam | Water Tank Leakage | Girna Dam
Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’चा मुख्य कालवा वाहू लागला

रब्बी हंगाम व पावसाळा पुराचे पाण्याने पुनर्भरण, अशा एकूण वर्षातून साधारणपणे आठ-नऊ महिने जामदा डावा कालवा प्रवाहित असतो. यामुळे कालवा व त्याच्या वितरण प्रणालीच्या साऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून झाडेझुडपे उगवतात. तसेच पावसाळ्यात कालव्यातून पाण्याची गळती होऊन व पावसाचे पाण्याने मिळून शेतीपिकांचे नुकसान होत असते. शिवणी, खेडगाव येथील जामदा डावा कालवा गळतीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होते.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी करतात. तसेच पावसाळ्यात कालव्यातून पाणी सोडण्यास विरोध करतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जामदा डावा कालवा किलोमीटर २४ व २६ मधील काही लांबीत कालव्यास आतून काँक्रीट लाइनिंग करण्याची त्रस्त शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी होती. याची दखल घेऊन आमदार किशोर पाटील यांन याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता श्रीकांत दळवी व गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अग्रवाल यांनी या ठिकाणी क्षेत्रीय पाहणी करून तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याची आदेश दिले होते. त्या अंदाजपत्रकास कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता तापी खोरे महामंडळ यांनी त्यास निधीची उपलब्धता करून दिली. ही कामे गुणवत्ता पूर्ण व्हावी, त्यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून चांगले पद्धतीने व वेगाने कामे पूर्ण करण्यात आली.

कालव्यातून पाण्याची गळती होऊन कालव्यालगतच्या शेतात पाणी साचून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागायचे. त्यामुळे कालव्याच्या काँक्रिटीकरण लायनिंगच्या कामाला गती देण्यात आली आहे. कालवा मजबुतीकरण करण्यावर आमचा भर आहे.
देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com