Kukadi Canal : कुकडी डाव्या कालव्याच्या पोटचारीचे खोलीकरणाला वेग

Agriculture Irrigation : जवळे (ता. आंबेगाव) येथील कुकडी डाव्या कालव्याच्या पोटचारीचे खोलीकरण व साफसफाईचे काम प्रगतिपथावर सुरू आहे.
Kukadi Canal
Kukadi CanalAgrowon

Pune News : ‘‘जवळे (ता. आंबेगाव) येथील कुकडी डाव्या कालव्याच्या पोटचारीचे खोलीकरण व साफसफाईचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार आहे. याचा फायदा शेतीला होईल,’’ अशी माहिती वसंत लायगुडे यांनी दिली.

सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नातून कुकडी डाव्या कालव्याच्या जवळे (ता. आंबेगाव) येथील पोटचारीचे खोलीकरण व साफसफाईचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Kukadi Canal
Kukadi Water : कुकडी प्रकल्पाच्या हक्काच्या पाण्यासाठी ठिय्या

या खोलीकरण व साफसफाई कामाची पाहणी कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर व दत्तात्रेय कोकणे यांनी केली. हे काम रावसाहेब मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Kukadi Canal
Kukadi Project : कुकडी प्रकल्पांतर्गत धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

आयटीसी- मिशन सुनहरा कल व जलसंपदा विभाग व डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्था- नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भीमाशंकर पाणी वापर संस्थेचे संचालक, शेतकरी व ग्रामस्थांना जलसाक्षरता प्रशिक्षण देण्यात आले.

जलसिंचन प्रणाली व मायनर, शेतचारी साफसफाईबाबत जनजागृती केली. या वेळी युवा नेते किरण खालकर, भाऊ गावडे, बबन बोराटे, दिनकर शिंदे संतोष खिलारी, कैलास खिलारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com