Kukadi Project : कुकडी प्रकल्पांतर्गत धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

Kukadi Dam Water Level : कुकडी प्रकल्पात ४८.४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा
 Kukadi Project
Kukadi ProjectAgrowon
Published on
Updated on

Kukadi Water News : नारायणगाव : कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण लाभक्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांच्या पाणी साठ्यात रोज सुमारे एक टीएमसीने वाढ होत आहे. शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी चार वाजेपर्यंत कुकडी प्रकल्पात १४.३७९ टीएमसी (४८.४५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील वीस दिवसांत १२.६७९ टीएमसीने (४२.७९ टक्के) लक्षणीय वाढ झाली आहे. प्रकल्पात गतवर्षी आजअखेर २१.१८ टीएमसी (७१.३८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

या वर्षी प्रथमच उन्हाळी हंगामात दोन आवर्तने सोडल्याने कुकडी प्रकल्पातील धरणांनी तळ गाठला होता. पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली होती. ३० जूनअखेर प्रकल्पातील धरणांत १.७ टीएमसी (५.८६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता. जून महिना कोरडा गेल्याने चिंता वाढली होती.


मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात रोज एक टीएमसीने वाढ होत आहे.

 Kukadi Project
Kukadi Water : कुकडी प्रकल्पाच्या हक्काच्या पाण्यासाठी ठिय्या

कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ३१० मिलिमीटर पाऊस झाला. तळ गाठलेल्या पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत पाणीसाठ्यात २ टीएमसी; तर उपयुक्त पाणीसाठ्यात ०.४७४ टीएमसी वाढ झाली आहे. वडज धरण क्षेत्रात २३१ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्यात ०.५०८ टीएमसीने वाढ झाली आहे. माणिकडोह धरण क्षेत्रात ३०६ मिलिमीटर पाऊस झाला.

पाणीसाठ्यात सुमारे ३.५५८ टीएमसीने वाढ झाली आहे. डिंभे धरण क्षेत्रात २९३ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात ७.०३७ टीएमसीने वाढ झाली आहे. येडगाव धरण क्षेत्रात सर्वांत कमी १२९ मिलिमीटर पाऊस झाला. मात्र या धरणात चिल्हेवाडी धरणाचे पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात सुमारे १.०६ टीएमसीने (५२.७७ टक्के) वाढ झाली आहे.


 Kukadi Project
Smart Cotton Project : ‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण

सात तालुक्यांचे लक्ष
कुकडी प्रकल्पातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या धरणांची उपयुक्त पाणी साठवणक्षमता ३० टीएमसी आहे. कुकडी प्रकल्प जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यांना वरदान ठरला आहे. शेती सिंचनाखालील सुमारे दीड लाख एकर क्षेत्र कुकडी प्रकल्पावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यात कुकडी प्रकल्पात किती पाणीसाठा होतो, याकडे सात तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.


कुकडी प्रकल्पातील धरणांचा आजअखेर उपयुक्त पाणीसाठा टीएमसीत व कंसात टक्केवारी : येडगाव : १.७ (८५.५४.), वडज : ०.५९० (५०.३२), डिंभे : ७.४८५ (५९.९१), माणिकडोह : ४.१२७(४०.५५), पिंपळगाव जोगे : ०.४७४ (१२.१९ टक्के), चिल्हेवाडी : ०.६३४ (७९.०२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com