Onion Export : कांद्यावरील निर्यातशुल्क रद्द करा; माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल

Onion Protest : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले ४० टक्के निर्यातशुल्क तत्काळ रद्द करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देत केली.
माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल
माजी आमदार शिरीषकुमार कोतवालAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले ४० टक्के निर्यातशुल्क तत्काळ रद्द करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देत केली.

माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल
Onion Export : कांदा निर्यात शुल्काविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलनात

कांद्याला दर मिळू लागल्यानंतर मोदी सरकारने पुन्हा एकदा खेळी करत निर्यातीवर ४० टक्के कर लावत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. निर्यातीवर कर लावण्यात आल्यानंतर राज्यासह संपूर्ण देशात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. याच निर्णयाचा निषेध करत श्री. कोतवाल यांनी हे निर्यात शुल्क मागे घेण्याची मागणी केली. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे. यातच आता कांद्याला कुठे चांगला भाव मिळत असताना शासनाने हा तुघलकी निर्णय घेत शेतकऱ्यांचा विश्‍वास गमाविलेला आहे.

माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल
Onion Export : कांदा खरेदी खरेदीच्या निर्णयाला शेतकरी संघटनांकडून विरोध

सरकारला शेतकरी माय बाप सर्वसामान्य जनतेबरोबर काही घेणे देणे नाही.  परंतु शेतकरी मायबाप जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी होऊन रस्त्यावर उतरू. केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा उत्पादन शेतकरी विरोधातील निर्यात शुल्क ४० टक्केचा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा. जर मागणीचा विचार झाला नाही तर तीन दिवसात चांदवड रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री. कोतवाल यांनी दिला.  शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.

यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर, प्रहार चे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, विलास भवर, शिवाजी कासव, राहुल कोतवाल, भरत ठाकरे, विजय जाधव, संपतराव वक्टे, नवनाथ भवर, दशरथ गांगुर्डे, योगेश न्याहारकर, बबन ठोंबरे, दत्तात्रेय वाघचौरे, प्रकाश शेळके, अनिल शहाजी पाटील, केशव ठाकरे, ज्ञानेश्वर आवारे, साहेबराव चव्हाण, उत्तमराव ठोंबरे, कमरुद्दीन इनामदार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com