PM Kisan : अपात्र लाभार्थ्यांकडून ‘पीएम किसान’ निधीची वसुली सुरू

भूमी अभिलेख विभागाकडून जमीन सीडिंग प्रक्रिया केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भूमिहीन व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत.
PM Kisan
PM KisanAgrowon

Parbhani News : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम -किसान) (Pm Kisan Sanaman Yoajana) अंतर्गत अनुदानासाठी नोंदणी केलेले परभणी जिल्ह्यातील ६ हजार ९२३ आयकर दाता, तसेच इतर कारणांस्तव अपात्र २ हजार ७२५ लाभार्थी असे एकूण ९ हजार ६४८ लाभार्थी या योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत.

त्यांच्याकडून ११ कोटी ६८ लाख ५० हजार रुपये रकमेची वसुली केली जाणार आहे. तहसील कार्यालयाने वारंवार लेखी नोटिसा देऊनही लाभाची रक्कम जमा न केल्यामुळे वाद दाखलपूर्व प्रकरण लोकन्यायालयाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयांनी जानेवारी महिन्यात संबंधितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत वसुली नोटीस पाठविल्या आहेत.

संबंधितांकडून तहसील कार्यालयात रोख रक्कम भरणा केला जात आहे. १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत १ हजार २३८ आयकर दात्यांकडून १ कोटी ६० लाख ५८ हजार रुपये आणि इतर २९९ लाभार्थांकडून २४ लाख ४ हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांना २ हजार रुपये, यानुसार वार्षिक ६ हजार रुपये अनुदान आधार क्रमांक संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.

या योजनेच्या लाभासाठी आयकर दाता शेतकरी अपात्र आहेत. ही योजना सुरू झाली त्या वेळी अनेक जमीन नसलेल्या व्यक्तींनी नोंदणी केली.

PM Kisan
PM Kisan : ‘पीएम किसान’साठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक

भूमी अभिलेख विभागाकडून जमीन सीडिंग प्रक्रिया केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भूमिहीन व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत. आयकर दाता शेतकरी तसेच इतर कारणांस्तव अपात्र लाभार्थींना देण्यात आलेला लाभ रद्द करण्यात आला आहे.

त्यामुळे अपात्र लाभार्थींच्या खात्यावर आजवर जमा झालेल्या सर्व हप्त्यांच्या अनुदानाची रक्कम वसूल केली जात आहे. तहसील कार्यालयाकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर अनेक आयकर दाता शेतकऱ्यांनी तत्काळ अनुदानाची रक्कम परत केली.

परंतु त्याबाबतची आकडेवारी अनेक तहसील कार्यालयाकडून अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे सर्वच आयकर दात्यांना नोटीस पाठविण्यात आल्या. रक्कम परत करूनही पुन्हा नोटीस पाठविल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लाभार्थींच्या संख्येत घट....

परभणी जिल्ह्यात पीएम किसान अंतर्गत पहिल्या हप्त्याचे ३ लाख १३ हजार ९६७ लाभार्थीं होते. त्यानंतर अपात्रतेमुळे लाभार्थींची संख्या कमी झाली. या अंतर्गत ११ वा हप्ता १ लाख ९१ हजार १८४ आणि १२ वा हप्ता ७९ हजार ९४९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला.

या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना १३ वा हप्ता गावातच पोस्टमनकडून मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना आधार क्रमांक आयपीपीबी (इंडियन पोस्टल पेमेंट बँक) खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. परभणीत २४ हजार लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न नाहीत.

आयकर दाता लाभार्थी नोटीस, वसुली स्थिती (१० फेब्रुवारीपर्यंत)

तालुका- एकूण नोटीस- एकूण वसुली रक्कम- रक्कम वसूल लाभार्थी- वसूल रक्कम

परभणी - ११७९ १५५९२००० १५३ १९३६०००

जिंतूर- १२१९ १४८६२००० १५४ १६३४०००

सेलू - ९५२ १२५३०००० १९९ २७१६०००

मानवत - ४८४ ६६२४००० ७९ १११४०००

पाथरी- ६५१ ९५४४००० ६० ५१२०००

सोनपेठ- ४९१ ७१८०००० १११ १९२४०००

गंगाखेड- ७३३ १०००८००० १४४ १९५४०००

पालम - ५३७ ७७०४००० १४० १९८४०००

पूर्णा - ६७७ ९२८६००० १९८ २२८४०००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com