स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज घडेल

‘‘स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून सुदृढ, आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीचे महत्त्व वारकरी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल आणि आरोग्यदायी समाज घडेल,’’ असा विश्‍वास कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी व्यक्त केला.
Palkhi Sohala
Palkhi SohalaAgrowon

पुणे ः ‘‘स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून सुदृढ, आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीचे महत्त्व वारकरी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल आणि आरोग्यदायी समाज घडेल,’’ असा विश्‍वास कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया (Manojkumar Lohiya) यांनी व्यक्त केला. ग्रामविकास (Rural Development) आणि पाणीपुरवठा (Water Supply) व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वच्छता व ग्रामसभा दिंडी-२०२२’चा (Swachhata Dindi) प्रारंभ शुक्रवारी (ता.२४) लोहिया यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, ‘यशदा’चे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी, उपायुक्त विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, मिलिंद टोणपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

लोहिया म्हणाले, ‘‘प्लॅस्टिकमुक्ती, हागणदारीमुक्ती स्वच्छता मोहिमेबाबत शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. कोरोनाच्या महामारीत सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे. आता सर्वांनी मिळून स्वच्छता मोहिमेला अधिक व्यापक करायचे आहे.’’

डॉ. रामोड म्हणाले, ‘‘वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, आरोग्याची अडचण सोडविण्यासाठी स्वच्छ पाणी, महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र शौचालय, राहण्याची व्यवस्था आदी सेवा-सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने ३१ आरोग्य पथके स्थापन करून सेवा देण्यात येत आहे. पालखी मार्गांवर ५६ ठिकाणी पाण्याचे स्रोताद्वारे तसेच जवळपास ७५ टँकर अधिग्रहित करून पाण्याची सुविधा केली आहे. स्वच्छता दिंडीद्वारे स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचेल.’’

कलशेट्टी म्हणाले, ‘‘ग्रामविकास विभागाने मोबाइल शौचालय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हागणदारीमुक्त गावाबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकमुक्तीच्या दृष्टीने जनजागृती करण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून स्वच्छतेबाबत काम करण्याची गरज आहे.’’

आयुष प्रसाद म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ‘स्वच्छता व ग्रामसभा दिंडी-२०२२’ तसेच आरोग्य दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने वारीच्या बाबतीत सहा प्रकारचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये कचरामुक्त वारी, हागणदारीमुक्त वारी करण्यात येणार आहे.’’ या वेळी वारकऱ्यांना योजनांची माहिती होण्यासाठी प्रचार प्रसिद्धी साहित्य, वारीमध्ये दिंडी प्रमुखांना वाटप करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार किटचे अनावरण करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com