Agriculture Electricity : कृषिपंपांची नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदलण्याची मोहीम सुरू

कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वीज वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते तत्काळ बदलण्याची मोहीम सध्या महावितरणकडून सुरू आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत.
Agricultural Electricity
Agricultural ElectricityAgrowon
Published on
Updated on

मुंबई : कृषिपंपांना (Agriculture Pump) वीजपुरवठा (Electricity Supply) करणारे वीज वितरण रोहित्र (Electricity Transformer) नादुरुस्त झाल्यास ते तत्काळ बदलण्याची मोहीम सध्या महावितरणकडून (Mahavitaran) सुरू आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत. तर गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेले केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्र बदलणे शिल्लक असून ते देखील तत्काळ बदलण्यात येत आहेत. तर महावितरणकडे सद्यःस्थितीत तब्बल ४ हजार १८ रोहित्र बदलण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत.

Agricultural Electricity
Agriculture Electricity : दिवसभर राबा, रात्री पाण्यासाठी जागा

राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी थकीत व चालू वीजबिलांपोटी खंडित करू नये. तसेच नादुरुस्त झालेले वितरण रोहित्र सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तत्काळ बदलून द्यावे, असे आदेश दिले आहेत. त्याची चोख अंमलबजावणी महावितरणकडून सुरू आहे. यामध्ये राज्यभरात २९ नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेले ६ हजार ९२ व त्यानंतर शनिवारी (दि. १७) पर्यंत नादुरुस्त झालेले ६ हजार ५१६ असे एकूण १२ हजार ६०८ नादुरुस्त रोहित्र महावितरणकडून युद्धपातळीवर बदलण्यात आले आहेत.

Agricultural Electricity
Agriculture Electricity : एक लाख पाच हजार वीजजोडण्या देण्याचा निर्धार

कृषिपंपांना तीन फेजचा वीजपुरवठा करणारे महावितरणचे राज्यभरात एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहित्र आहेत. यापूर्वी विविध कारणांमुळे सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहित्र दररोज बदलणे शिल्लक राहत असल्याची परिस्थिती होती. तथापि, यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र तत्काळ बदलून देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री फडणवीस यांनी दिले.

Agricultural Electricity
Agriculture Electricity : अमरावती जिल्ह्यात २०३२ कृषिपंप जोडण्या प्रलंबित

त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कृती आराखड्याद्वारे सूक्ष्म नियोजन करून व बैठकीद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलण्याची सक्त सूचना केली. सोबतच महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यात दौरे करून सर्व परिमंडलांचा आढावा घेत नादुरुस्त रोहित्र बदलण्याची कार्यवाही वेगवान केली.

परिणामी शनिवार (दि. १७) पर्यंत राज्यभरात मागील दोन दिवसांमध्ये बदलणे शिल्लक राहिलेल्या नादुरुस्त रोहित्रांची संख्या केवळ ६२२ असून ते देखील तत्काळ बदलण्याची कार्यवाही सुरू आहे. नादुरुस्त किंवा जळालेले वितरण रोहित्रांची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणने राज्यभरात १९३४ कंत्राटदार एजन्सीजची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सद्यःस्थितीत ११ हजार ६३२ रोहित्र दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे रोहीत्रांच्या दुरुस्तीचा वेग देखील प्रचंड वाढला आहे.

रोहित्र बदलण्यासाठी टोल फ्री क्रमांक

नादुरुस्त झालेले रोहित्र बदलण्यासाठी महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे ऑईलसह तब्बल ४ हजार १८ रोहित्र सद्यःस्थितीत अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती शेतकरी बांधवांनी संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरू असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com