Fertilizer Selling : निविष्ठांची जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा

kharif Season Management : यंदाच्या खरिपाचे नेटके नियोजन करा, खते बियाणे, कीटकनाशके या कृषी निविष्ठांची जादा दराने होणारी विक्री, भेसळयुक्त खते यावर लक्ष ठेवा, भरारी पथकामार्फत तातडीने कारवाई करा.
Fertilizer Selling
Fertilizer Selling Agrowon
Published on
Updated on

Solapur News : यंदाच्या खरिपाचे नेटके नियोजन करा, खते बियाणे, कीटकनाशके या कृषी निविष्ठांची जादा दराने होणारी विक्री, भेसळयुक्त खते यावर लक्ष ठेवा, भरारी पथकामार्फत तातडीने कारवाई करा.

खते-बियाणे आणि कीटकनाशकांचे नमुने घ्या, तपासणीसाठी पाठवा, त्यात दोषी असणाऱ्या कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करा, अशा सक्त सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या.

Fertilizer Selling
Kharif Season 2023 : खते, बियाणे खरेदीकडेही शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

खरीप हंगाम २०२३ नियोजन आणि एक कुटुंब, एक वृक्ष अभियानासंबंधी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली, त्यात श्री. स्वामी यांनी या सूचना दिल्या.

जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्‍वर वाघमोडे, सहायक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी आदी यामध्ये सहभागी झाले. या वेळी कृषी विकास अधिकारी वाघमोडे यांनी जिल्ह्यातील खते, बियाण्यांचा उपलब्ध साठा, भरारी पथके यांची माहिती दिली.

कृषी केंद्रेही लावणार वृक्ष

जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांनी प्रत्येकी २० वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्ष लागवड करून ट्रीगार्डवर त्यांच्या दुकानाची पाटी लावण्यात येणार आहे.

तसेच त्या-त्या भागातील विविध कार्यकारी सेवा संस्था, शिक्षण संस्था यांचाही सहभाग यामध्ये घेण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमात संबंधित गावातील ग्रामस्थांचा सहभाग घ्या, त्यांच्यामुळे उपक्रम यशस्वी होण्यास मदत होईल, असेही स्वामी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com