Animal Husbandry : सिंधुदुर्गमध्ये पशुसंवर्धन विभागातील ९१ पदे रिक्त

सिंधुदुर्गलगतच्या काही जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पशुसंवर्धन विभागाकडून दक्षता घेतली जात आहे; मात्र या विभागातील रिक्त पदे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
Department Of Animal Husbandry
Department Of Animal HusbandryAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा पशुसंवर्धन विभागातील (Department Of Animal Husbandry Sindudurg) ९१ पदे रिक्त आहेत. सध्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव होत असलेल्या लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) या त्वचा आजाराच्या अनुषंगाने ही पदे (Vacant Post Department Of Animal Husbandry) तातडीने भरण्यात यावीत आणि खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

Department Of Animal Husbandry
Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा तोकडी

सिंधुदुर्गलगतच्या काही जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पशुसंवर्धन विभागाकडून दक्षता घेतली जात आहे; मात्र या विभागातील रिक्त पदे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये ७७ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित असून त्यासाठी २०६ पदे मंजूर आहेत.

त्यातील ९१ पदे रिक्त आहेत. यामध्ये पशुधन अधिकाऱ्यांची २५ पैकी १५ पदे, पशुधन पर्यवेक्षकाची ६८ पैकी ३३ पदे तर व्रनोपचारकांची १० पैकी ८ पदे रिक्त आहेत. परिचारकांची ८४ पैकी ३५ पदे रिक्त आहेत.

पशुसंवर्धन विभागातील पदे रिक्त आहेत, हे वास्तव आहे. परंतु उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही लम्पी स्कीन आजाराच्या अनुषंगाने सर्व ती खबरदारी घेत आहोत. जनावरांना काहीही त्रास जाणवल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
डॉ. विद्यानंद देसाई, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.
जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत आणि लम्पी स्कीनच्या संदर्भाने शासनाने योग्य खबरदारी घ्यावी. रिक्त पदांमुळे जनावरांवर वेळेत उपचार होत नाहीत.
रणजित तावडे, पशुपालक, वैभववाडी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com