Grape Farmer Fraud : व्यापाऱ्यांचा द्राक्ष उत्पादकांना ८८ लाख रुपयांचा गंडा

खोरीफाटा (ता. दिंडोरी) येथील एका व्हेजिटेबल कंपनीला दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीचे कमिशन देण्याचे आमिष दाखविले.
Grape
GrapeAgrowon

Nashik News : वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक : खोरीफाटा (ता. दिंडोरी) येथील एका व्हेजिटेबल कंपनीला (Vegetable Company) दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीचे (Grape Procurement) कमिशन देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ८८ लाख ५८ हजार ८५४ रुपयांची द्राक्षे खरेदी करून रक्कम न देताच पलायन केले. या प्रकरणी वणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

वणी-सापुतारा रस्त्यावरील खोरी फाटा मार्केट येथे माळे दुमाला (ता. दिंडोरी) येथील विकास हिरामण घुगे यांची वक्रतुंड व्हेजिटेबल कंपनी आहे.

त्यांना तेजपालसिंह कुशवाह ऊर्फ राहुलभाई (रा. पश्‍चिम दिल्ली) व आशिष मिश्रा (रा. मंडी, दिल्ली) यांनी ‘शेतकऱ्यांकडून द्राक्षे खरेदी करा व ती आम्ही खरेदी करू,’ त्यापोटी प्रतिक्रेट पॅकिंग २५ रुपयेप्रमाणे कमिशन देतो,’ असे सांगून विश्‍वास संपादन केला.

Grape
Grain Procurement Fraud : धान्य खरेदीच्या नावावर अकोल्यात कोट्यवधींची फसवणूक

घुगे यांनी परिसरातील ५० परिचित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांचा १ कोटी ७९ लाख ४३ हजार १८८ रुपये किमतीचा द्राक्षमाल खरेदी केला. १० आणि २० किलोंची क्रेट पॅक करून २२ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या काळात व्यापाऱ्याने पाठविलेल्या गाडीत माल पोहोचविला. त्यापोटी तेजपाल याने घुगे यांना चार लाख रुपये रोख, तर ७८ लाख ७८ हजार रुपये बँक खात्यात वर्ग केले.

Grape
Fraud: हळद व्‍यापाऱ्याकडून ११ शेतकऱ्यांना ३१ लाखांचा गंडा

त्यानुसार घुगे यांनी ८२ लाख ७८ हजार रुपये ३० शेतकऱ्यांना अदा केले. तर उर्वरित २० शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे ८८ लाख ५८ हजार ८५४ रुपये व्यापाऱ्यांकडून येणे बाकी होते.

शिल्लक रक्कम घेण्यासाठी घुगे हे १ मार्च रोजी कुशवाह राहत असलेल्या माळेदुमाला शिवारातील हॉटेलमधील रूमवर गेले. मात्र तोपर्यंत त्याने रूमला कुलूप लावून पलायन केले होते.

वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

व्यापाऱ्यांचा ठावठिकाणा लागत नाही व संपर्क होत नसल्याने व द्राक्ष उत्पादकांनी पैशांसाठी तगादा घुगे यांच्याकडे तगादा सुरू केला. त्यानंतर घुगे यांनी वणी पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com