Grain Procurement
Grain ProcurementAgrowon

Grain Procurement Fraud : धान्य खरेदीच्या नावावर अकोल्यात कोट्यवधींची फसवणूक

धान्य खरेदीच्या नावावर अकोल्यातील व्यापाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.
Published on

Akola Market News : धान्य खरेदीच्या (Grain Procurement) नावावर अकोल्यातील व्यापाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामध्ये काही लहान धान्य व्यापारी, दलाल आणि मोठ्या शेतकऱ्यांना (Farmers Loss) थेट फटका बसला आहे. धान्याची रक्कम वसूल करण्यासाठी मध्यस्थी दलाल आणि व्यापाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांत तेथील एका व्यापाऱ्याने १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर अकोल्यातील मनीष जैन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Grain Procurement
Tur, Chana Market : देशातून हरभरा, तूर निर्यात वाढली; दर सुधारतील का?

विदर्भातील लहान व्यापारी आणि मोठ्या शेतकऱ्यांकडून तूर, हरभरा, मूग, सोयाबीन इत्यादी माल खरेदी करण्याचा व्यापार सुरू होता. एजंटच्या मध्यस्थीतून थेट व्यवहार होऊ लागले. चांगला दर मिळत असल्याने विदर्भातील अनेक व्यापारी देखील माल दिल्यानंतर आठ दिवस रकमेसाठी थांबत होते.

Grain Procurement
Soybean Market : देशातील सोयाबीन बाजार दबावात का आला?

काही दिवसानंतर व्यापाऱ्यांची थकीत रक्कम भरमसाट वाढत गेली. लहान व्यापाऱ्यांनी जैन यांच्याकडे पैशांसाठी तगादा सुरू केला. अकोल्यातील व्यापाऱ्यांनी जैन यांच्या घरी आणि ते जेथे माल ठेवतात त्या एमआयडीसी दोनमधील गोदामावर जाऊनही विचारणा केली. व्यापाऱ्यांकडून घेतलेला कोट्यवधींचा माल परस्पर विकला की गहाण ठेवला याबाबत कुणी स्पष्ट बोलायला तयार नाही.

वाटाघाटी सुरू असताना हिंगणघाट येथे पोलिसात तक्रार दाखल झाली. त्यानंतर तडकाफडकी हिंगणघाट पोलिसांनी जैन यांना अटक करून चौकशी सुरू केली आहे. हे प्रकरण अधिक प्रमाणात वाढत जाण्याची शक्यता असून, फसवणुकीची रक्कम सुमारे ४० कोटींपर्यंत असल्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com