Jayakwadi Irrigation Department : जायकवाडी पाटबंधारे विभागात ७८.५७ टक्के पदे रिक्त

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अडचणी; सिंचनासाठी मिळत नाही
Jayakwadi Dam
Jayakwadi DamAgrowon

परभणी ः जायकवाडी पाटबंधारे विभाग (Jayakwadi Irrigation Department) क्रमांक २ अंतर्गत आकृतिबंधानुसार मंजूर पदांची संख्या ८४० आहे. त्यापैकी केवळ १८० पदे (२१.४२) कार्यरत असून विविध संवर्गातील ६६० पदे (७८.५७ टक्के) रिक्त आहेत. तोकड्या कर्मचारी संख्येमुळे सिंचन व्यवस्थापनासाठी अडचणी येत आहेत. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या प्रकल्पांचे सिंचन क्षेत्र (Irrigated Area) केवळ कागदावरच दिसते.

परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ च्या कार्यकारी अभियंता कार्यालयाअंतर्गत पाथरी, दैठणा, लोहगाव, परभणी, जिंतूर, परभणी या सहा उपविभागांचा समावेश आहे. याअंतर्गत सिंचन व्यवस्थापन, अस्थायी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधानुसार कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांचे प्रत्येकी १ पद, उपविभागीय अभियंत्याची ६ पदे, शाखा अभियंत्याची ४३ पदे, कालवा निरीक्षकांची २४३ पदे, मोजणीदारांची १३२ पदे, कालवा चौकीदारांची ९९ पदे, कालवा टपालीची ३३ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची ३३ पदे, दप्तर कारकूनांची ८१ पदे, संदेशकांची ३३ पदे, शिपायांची ५० पदे, कनिष्ठ लिपिकांची १६ आणि वरिष्ठ लिपिकांची ११ पदे, वाहन चालकांची ७ पदे आदी मिळून विविध संवर्गातील ८४० पदे मंजूर आहेत.

Jayakwadi Dam
Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी ४९ लाख पूर्वसूचना

या विभागाअंतर्गत जायकवाडी डावा कालवा तसेच करपरा (ता. जिंतूर) मासोळी (ता. गंगाखेड) हे दोन मध्यम प्रकल्पांचे सिंचन व्यवस्थापन केले जाते.जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, परभणी, पूर्णा या सहा तालुक्यांतील १७५ गावांतील ९७ हजार ४०० हेक्टरांचा अंतर्भाव आहे. मुख्य कालव्याची लांबी ८६ किलोमीटर आहे. वितरण प्रणालीमध्ये पाच शाखा कालवे आणि ३२ सरळ वितरिकांचा समावेश आहे.

करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे लाभक्षेत्र २ हजार १४१ हेक्टर, मासोळी (ता. गंगाखेड) मध्यम प्रकल्पाचे लाभक्षेत्र २ हजार ५९६ हेक्टर आहे. गेल्या अनेक वर्षांतील सेवानिवृत्ती तसेच नवीन भरती नसल्यामुळे रिक्त पदांच्या संख्येत भर पडत आहे. शाखा अभियंत्याची केवळ ७ पदे कार्यरत असून ३६ पदे रिक्त आहेत. कालवा निरीक्षकांची ३४ पदे कार्यरत असून २३० पदे रिक्त आहेत. कालवा चौकीदारांची ७२ पदे, कालवा टपालीची २६ पदे मोजणीदारांची १०६ पदे रिक्त आहेत.

विविध संवर्गातील एकूण ६६० पदे रिक्त आहेत. त्यामुळे कालव्याची देखभाल दुरुस्ती, सिंचन मागणी अर्ज, सिंचित क्षेत्राची मोजणी, सिंचन पाणी पट्टीची वसुली आदी कामांसाठी अपुऱ्या कर्मचाऱ्यावर ताण येत आहे. नियोजन कोलमडते. कालव्याच्या पाण्याची मोठया प्रमाणावर नासाडी होते. कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही. पाणी पट्टीची थकबाकी वाढत चालली आहे. सिंचनाच्या योग्य नियोजनासाठी रिक्त पदे भरण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com