मराठवाड्यात तीन कोटी २२ लाख टन उसाचे गाळप

यंदाचा ऊस गाळप हंगाम चांगलाच लांबला. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी ७, उस्मानाबादमधील १४, नांदेड व परभणीतील प्रत्येकी ६ , हिंगोलीतील ५ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम ९ जून पूर्वीच आटोपला. दुसरीकडे ९ जूननंतर लातूरमधील ५ व जालन्यातील ४ कारखान्यांचे ऊस गाळप सुरू होते.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ पैकी सहा जिल्ह्यांतील ४५ व जालना, लातूर जिल्ह्यांतील ६ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम ९ जूनपूर्वीच आटोपला आहे. आठही जिल्ह्यांतील कारखान्यांनी ३ कोटी २२ लाख ६९ हजार २०८ टन उसाचे गाळप करत तीन कोटी २२ लाख १० हजार ४६३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

यंदाचा ऊस गाळप हंगाम चांगलाच लांबला. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी ७, उस्मानाबादमधील १४, नांदेड व परभणीतील प्रत्येकी ६ , हिंगोलीतील ५ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम ९ जून पूर्वीच आटोपला. दुसरीकडे ९ जूननंतर लातूरमधील ५ व जालन्यातील ४ कारखान्यांचे ऊस गाळप सुरू होते. जालन्यातील सुरू कारखान्यांचे गाळपही सोमवारपर्यंत उरकल्यात जमा असल्याचे साखर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २८ लाख ६७ हजार ३७ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.४३ टक्के साखर उताऱ्याने २९ लाख ९० हजार ९९१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. बीड जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी ४७ लाख १२ हजार ४२० टन उसाचे गाळप करून सरासरी ८.६९ टक्के साखर उतारा घेतला. तर ४० लाख ९५ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ७० लाख ९५ हजार ५३६ टन उसाचे गाळप केले. तर ६७ लाख ९४ हजार ९६४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

परभणी जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी ४० लाख ५३ हजार ९१५ टन ऊस गाळप केला. तर ४२ लाख २० हजार २८८ क्विंटल साखर उत्पादित केली. साखर उतारा सरासरी १०.४१ टक्के राहिला. हिंगोली जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी २१ लाख ४८ हजार ४०७ टन उसाचे गाळप करून २२ लाख ६६ हजार २७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी २५ लाख ३० हजार ७०७ टन ऊस गाळप करून २४ लाख ७९ हजार ३५ क्विंटल साखर उत्पादित केली.

लातूर, जालन्यात ८८ लाख टन उसाचे गाळप

नऊ जूनपर्यंत लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ५९ लाख ६२ हजार ९६३ टन उसाचे गाळप केले. तर ६३ लाख २६ हजार ७१० क्विंटल साखर उत्पादित केली. जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी २८ लाख ९८ हजार २२३ टन उसाचे गाळप करून ३० लाख ३६ हजार ९८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले, अशी माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com