Kasari Water Project : ‘कासारी’त ७० टक्के साठा

कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघू पाटबंधारे प्रकल्प येतात.
Water Stock
Water StockAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : शाहूवाडी तालुक्यातील काही गावांना व पन्हाळा तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कासारी (गेळवडे) या मध्यम प्रकल्पात (Kasari Water Project) मंगळवारअखेर (ता. ७) ७० टक्के पाणीसाठा (Water Storage) असून, तो गतवर्षीच्या तुलनेने एक टक्का अधिक आहे.

उर्वरित पाच लघुपाटबंधारे प्रकल्पात सरासरी ६२ ते ८५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. इतर सर्वंच लघू धरणांतील पाणीसाठा मुबलक असल्याने यंदा सिंचन व पिण्यासाठी जूनअखेर पाणी उपलब्ध होईल; असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघू पाटबंधारे प्रकल्प येतात.

Water Stock
Water Storage : निम्न दुधना प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा

गेळवडे या मुख्य धरणाची पाणीसाठा क्षमता २.७७ टीएमसी आहे. या प्रकल्पामधून शाहूवाडी तालुक्यातील २० गावांना व पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी म्हणजे ४१ गावांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून पाणी मिळते.

उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. गतवर्षी मंगळवारी गेळवडे धरणात ६९ टक्के पाणीसाठा होता. तो ७० टक्के आहे.

इतर लघू धरणांतील पाणीसाठा असा (कंसात गतवर्षीची टक्केवारी)

पडसाळी ७४ (७८ टक्के), पोंबरे ८५ (८२ टक्के), नांदारी ५४ (५६ टक्के), केसरकरवाडी ६० (७० टक्के), कुंभवडे ७५ (७६) असा ७ फेब्रुवारीअखेर कासारी पाणलोट क्षेत्रातील विविध धरणांत पाणीसाठा शिल्लक आहे.

जूनअखेर कासारी पाणलोट क्षेत्रातील गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही; अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com