Amaravati Water Storage : अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पांत ६८ टक्के जलसाठा

Amaravati Water Project : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात ६८ टक्के जलसाठा झाल्याने आगामी काळातील पाणीपुरवठा आणि सिंचनाची चिंता जवळपास मिटली आहे.
Water Stock
Water StockAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : जुलै महिन्यात झालेल्या पावसाने तूट भरून काढण्यासोबतच जलसाठा वाढविला आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात ६८ टक्के जलसाठा झाल्याने आगामी काळातील पाणीपुरवठा आणि सिंचनाची चिंता जवळपास मिटली आहे. अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या धरणासह सात मध्यम व ४५ लघुप्रकल्प आहेत.

शहरी व ग्रामीण भागात या प्रकल्पातून पाणीपुरवठा केल्या जातो, तर रब्बी हंगामात सिंचनासाठीही पाणी सोडण्यात येते. जून महिन्यात व जुलैच्या प्रारंभी पावसाची सरासरी नसल्याने चिंता वाढली होती.

मात्र नंतर जुलैमध्ये झालेल्या पावसाने तूट भरून काढत जलसाठा वाढविला. अमरावती महानगरासह शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात जुलैमध्ये ७४ टक्के जलसाठा होणे अपेक्षित असते, तो या वेळी ७९ टक्के झाला आहे.

Water Stock
Ujani Dam Water Storage : उजनी धरण उद्या ‘प्लस’मध्ये येणार

मध्यम प्रकल्पातही साठा समाधानकारक झाला आहे. बोर्डी नाला व पंढरी प्रकल्प वगळता पूर्णा, सपन, चंद्रभागा, शहानूर प्रकल्पातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. ४५ लघुप्रकल्पांपैकी बरेच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या प्रकल्पांत ६४ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Water Stock
Satara Dam Water Storage : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ७५ टक्के पाणीसाठा

जुलै महिन्यात जिल्ह्यातील जलसाठा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाचे दोन महिने अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीतील साठा व संभाव्य पावसामुळे होणारा साठा बघता भविष्यातील पाणीटंचाईची चिंता सध्यातरी मिटल्याचे बोलले जात आहे.

धरण जलसाठा (दलघमी) टक्केवारी

अप्पर वर्धा ४५०.२६ ७९.८३

शहानूर २३.७६ ५१.६१

चंद्रभागा ३१.३० ७५.८८

पूर्णा २०.४३ ५७.७५

सपन २५.७९ ६६.८१

पंढरी १६.४६ २९.१८

बोर्डी नाला २.२६ १८.६५

लघुप्रकल्प (४५) १३४.६७ ६४.३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com