Gun Surrender : नागरिकांकडून ६८ भरमार बंदुका पोलिसांच्या स्वाधीन

वडिलोपार्जित बंदुका व शस्त्रे देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांनी त्यांच्याकडे बाळगलेल्या ६८ भरमार बंदुका व १२ बॅरल पोलिस दलाच्या स्वाधीन केल्या.
Bharmar Gun
Bharmar GunAgrowon

गडचिरोली : वडिलोपार्जित बंदुका (Guns) व शस्त्रे देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांनी त्यांच्याकडे बाळगलेल्या ६८ भरमार बंदुका (Bharmar Gun) व १२ बॅरल पोलिस दलाच्या स्वाधीन केल्या.

Bharmar Gun
Indian Agriculture : आर्थिक स्थैर्याकरिता शेतीपूरक उद्योगांची गरज

डिसेंबर-२०२२ मध्ये उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोलिस स्टेशन दामरंचा २० भरमार, उपपोलिस स्टेशन रेपनपल्ली ५ भरमार, पोस्टे जिमलगट्टा २, उपविभाग अहेरीअंतर्गत उपपोस्टे पेरमिली १५ भरमार व ३ बॅरल, पोस्टे मुलचेरा २ भरमार, उपपोस्टे राजाराम (खां.) १२ भरमार व ९ बॅरल, उपविभाग पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत ८ भरमार, पोलिस मदत केंद्र गोडलवाही ४ भरमार बंदुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत.

Bharmar Gun
Future Agriculture : विमा, वीज, वित्त, वखार, वायदे बाजारांवर उद्याची शेती

भरमार बंदुका जमा केल्यामुळे नक्षलवादी जे सामान्य नागरिकांचा चळवळीसाठी वापर करत होते व सोबत भरमार बंदुका बाळगल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका होता, त्यास आळा बसला आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कामगिरीकरिता परिश्रम घेणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले असून, जिल्ह्यातील आणखी काही नागरिकांकडे भरमार बंदुका असल्यास त्यांनी आपले जवळचे पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र येथे स्वाधीन करावे, आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com