Crop Insurance : मराठवाड्यात ४५ लाख २७७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Marathwada Crop Insurance : तीन ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी; ७९ लाख शेतकरी सहभागी
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Crop Insurance Cover : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मंगळवारी (ता. १) सकाळी ९ वाजेपर्यंत ७९ लाख ७ हजार १२५ अर्जदार शेतकऱ्यांनी ४५ लाख २७७ हेक्टर क्षेत्र पीकविमा संरक्षित केले आहे. तीन ऑगस्टपर्यंत खरिपातील पिकांचा विमा उतरविण्याची संधी शेतकऱ्यांना असणार आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत आधी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा उतरवण्याची संधी होती. परंतु विमा उतरवण्याची मुदत वाढविण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार आता तीन ऑगस्टपर्यंत पीकविमा उतरवण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. माहितीनुसार, सोमवारी (ता. ३१) सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यभरातून १ कोटी ५० लाख ४७ हजार ७९८ शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला होता. मंगळवारी ही संख्या १ कोटी ५५ लाख ५० हजार २०२ वर पोहोचली होती.

Crop Insurance
Crop Insurance : मराठवाड्यात ४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

मराठवाड्यातील जिल्हा निहाय अर्जदार शेतकरी व विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)(सोमवारी सकाळी ९ पर्यंत)

जिल्हा शेतकरी संरक्षित क्षेत्र

छत्रपती संभाजीनगर ११०३७६१ ५२७९४४

जालना ९८५१३८ ४९५८४२

बीड १८०७०९६ ७६३७९३

लातूर ८४६२१३ ५८७१०१

धाराशिव ७४०२५१ ५८३०२६

नांदेड ११७४४६३ ७३४६४७

परभणी ७४८५७७ ४९०४४४

हिंगोली ५०१६२६ ३१७४८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com