Sugar Production : साखरविक्रीत मधली साखळीच गबर

Sugar Factory : सध्‍या कारखान्यांना क्विंटलला एक्स फॅक्टरी ३६०० ते ३६५० रुपये इतका दर मिळत आहे. साखरेची किंमत वाढणार हे गृहीत धरून व्यापारी पातळीवरूनही साखरेची साठवणूक करून भविष्‍यात ती जादादराने विक्री करण्याच्या प्रयत्न बाजारातील काही घटकांकडून होत आहे. कारखान्यांना ३६५० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. तर याच साखरेची विक्री घाऊक व किरकोळ बाजारात ४००० रुपयांपर्यंत होत आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Kolhapur News : सणासुदीचे दिवस आणि बाजारात साखर कमी असल्याच्या चर्चेमुळे घाऊक व किरकोळ बाजारात साखरेच्या किमतीत वाढ होत आहे. सध्‍या कारखान्यांना क्विंटलला एक्स फॅक्टरी ३६०० ते ३६५० रुपये इतका दर मिळत आहे. साखरेची किंमत वाढणार हे गृहीत धरून व्यापारी पातळीवरूनही साखरेची साठवणूक करून भविष्‍यात ती जादादराने विक्री करण्याच्या प्रयत्न बाजारातील काही घटकांकडून होत आहे. कारखान्यांना ३६५० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. तर याच साखरेची विक्री घाऊक व किरकोळ बाजारात ४००० रुपयांपर्यंत होत आहे. कारखान्‍यांना आणि ग्राहकांना मिळणाऱ्या किमतीत क्विंलमागे ३०० ते ३५० रुपयांपर्यंतचा फरक पडत आहे. ही रक्कम मधल्‍या साखळीला मिळत आहे.

Sugar Production
Sugar Production : जागतिक पातळीवर साखरेचे उत्पादन घटणार

गेल्या एक महिन्यापासून केंद्र सरकार साखर विक्रीच्या व्यवहारावर लक्ष ठेवून आहे. कारखान्यांकडून जीएसटीसहित पावत्या घेऊन साखर विक्रीची माहिती मागविण्यात येत आहे. गेल्‍या पंधरा दिवसांपासून सातत्‍याने व्यापारी पातळीवरून साखर महाग होणार असे वातावरण तयार केले जात आहे. अनेक कारखान्‍यांकडे सातत्‍याने साखरेची मागणी निविदांच्या मार्फत केली जात आहे. सणांमुळे येत्या काही दिवसांत साखरेला चांगली मागणी येण्याची शक्यता आहे. अनेक व्यापारी निविदांमध्ये काहीसा दर वाढवून घेऊन साखर खरेदी करत आहेत. जेवढी साखर मिळेल तितकी खरेदी करून त्याची साठवणूक करायची आणि जादा दराने बाजारात विक्री करायची असा प्रयत्न सुरू आहे.

साखर महाग झाली आहे, असे वातावरण तयार करून साखरेची विक्री ३९०० ते प्रसंगी ४००० रुपयांपर्यंत बाजारात करण्यास सुरुवात झाल्‍याने साखरेच्या किमती वाढल्या आहेत. बाजारात किमती वाढल्या असल्‍या तरी कारखान्यांना मात्र ३६५० रुपयांच्‍या वर भाव मिळत नसल्याची माहिती कारखाना प्रतिनिधींनी दिली. ४००० रुपयापर्यंतचा भाव हा कारखाने व ग्राहक यांच्यामध्ये काम करणाऱ्या घटकांनाच मिळत आहे. सणाला मागणी येणार हे गृहीत धरून मागणीत वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोटा संपवण्याच्या प्रयत्नात कारखाने होते. गेल्या काही दिवसांत मात्र साखरेला मागणी वाढत असल्याने सप्टेंबरचा निर्धारित कोटा सहज पूर्ण होईल, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com