Sugar Production : जागतिक पातळीवर साखरेचे उत्पादन घटणार

Sugar Market Price Update : यंदा ब्राझील वगळता जगातील इतर साखर उत्पादक देशांमध्ये साखर उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त होत आहे.
Sugar
Sugar Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : यंदा ब्राझील वगळता जगातील इतर साखर उत्पादक देशांमध्ये साखर उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त होत आहे. इंटरनॅशनल शुगर आर्गनायझेशननेही (आयएसओ) याला पुष्टी देत साखर उत्पादन कमी होण्याचा अहवाल दिला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत १.२ टक्क्याने साखर उत्पादन घटेल असा अंदाज आहे. १७४० लाख टन साखर उत्पादन जगभरात होण्याची शक्यता आहे. २०२३-२४ मध्ये साखरेचा खप १७६० लाख टन होईल असा अंदाज आहे.

२०२२२-२३ च्या तुलनेत हा खप ०.२५ टक्क्याने अधिक आहे. यंदा विविध देशांकडून ६१० लाख टन साखरेची निर्यात होऊ शकेल. २०२२-२३ च्या तुलनेत निर्यात ६ टक्क्यांनी कमी असेल असा अंदाज आहे. भारतातील साखर उत्पादन घटीच्या संभाव्य पार्श्‍वभूमीवर विशेष करून येणाऱ्या हंगामात भारतातून साखर निर्यात होऊ शकणार नाही असे बोलले जात आहे.

पुढील वर्षी एकूणच प्रमुख साखर उत्पादक देशांची निर्यात कमी असेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. बहुतांशी साखर उत्पादक देश यंदा देशांतर्गत बाजारातच साखर विक्रीला प्राधान्य देतील या निष्कर्षापर्यंत साखरतज्ज्ञ आले आहेत.

Sugar
Sugar Production: इथेनाॅलमुळे साखरेचे भाव स्थिर, थकबाकीचे प्रमाण घटले

सध्या ब्राझीलचा साखर हंगाम सुरू आहे. भारतासह अन्य काही देशांनी साखर निर्यातीला प्रतिबंध लावल्याने जागतिक बाजारात साखर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

भविष्‍यात साखरेचे दर चांगले राहण्याचा अंदाज असल्याने ब्राझीलमध्ये सुरुवातीपासूनच तेथील कारखान्यांनी इथेनॉलबरोबरच साखर उत्पादन वाढविण्याचे धोरण स्वीकारले.

यामुळे पहिल्‍या पंधरवड्यापासूनच वाढलेले साखरेचे उत्पादन जुलैमध्येही कायम आहे. जुलैच्या उत्तरार्धअखेर ब्राझीलमध्ये अंदाजापेक्षा ११ टक्के जास्त साखर उत्पादन झाले आहे.

Sugar
Malegaon Sugar Mill : माळेगाव कारखान्याच्या कामगारांची हुद्देवारी कायम

इथेनॉल उत्पादनातही अडीच टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूणच यंदाची साखरेबाबतची स्थिती पाहता ब्राझील साखर उत्पादनाला येणाऱ्या कालावधीतही प्राधान्य देऊ शकतो. यामुळे येणाऱ्या वर्षात साखर विक्रीतून मिळणारा जास्‍तीत जास्त नफा या देशाला होण्याची शक्‍यता आहे. याउलट भारतासारख्या देशाला उत्‍पादन घटीची चिंता सतावत आहे.

अनेक संस्‍थांनीही पुरेशा पावसाअभावी उत्पादन कमी निघेल असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतातून साखर निर्यातीला परवानगी मिळणार नाही अशीच सध्याची स्थिती आहे. यामुळे दोन वर्षांपूर्वी साखर उत्पादनाच्या बाबतीत जगात अव्‍वल बनलेल्‍या भारताला यंदा जागतिक बाजारातील दरवाढीचा फायदा होणार नसल्‍याची चर्चा साखर उद्योगात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com