Tomato
TomatoAgrowon

Tomato : टोमॅटो खरेदीत ३४ शेतकऱ्यांची ३१ लाखांची फसवणूक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केलेल्या टोमॅटोच्या व्यवहारापोटी शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने आडतदार व व्यापाऱ्यांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik APMC) खरेदी केलेल्या टोमॅटोच्या (Tomato Procurement) व्यवहारापोटी शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने आडतदार व व्यापाऱ्यांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल (Case Filed Against Trader And Adatdar) करण्यात आला आहे. ३४ शेतकऱ्यांचे ३१ लाख रुपये न दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

नाशिक बाजार समितीत आडतदार, व्यापारी असलेल्या पती-पत्नीने जवळपास ३४ शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केला होता; मात्र त्यानंतर खरेदी केलेल्या मालाची रक्कम अदा केलेली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांची तब्बल ३१ लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. बाजार समितीच्या वतीने याप्रकरणी प्राधिकृत केलेले कर्मचारी रवींद्र बद्रीनाथ तुपे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार संशयित आडतदार पुष्पा विलास शिंदे व व्यापारी विलास बाबुराव शिंदे (रा. दिंडोरी रोड) या दांपत्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tomato
Tomato : तंत्र टोमॅटो पुनर्लागवडीचे...

टोमॅटो उत्पादक शेतकरी ज्ञानेश्‍वर ढेमसे यांच्यासह इतर ३४ शेतकऱ्यांनी १ ते २३ जुलै या कालावधीत बाजार समितीमध्ये टोमॅटो विक्रीसाठी आणला होता. त्यावेळी संशयित शिंदे दांपत्याने लिलाव पद्धतीने टोमॅटो खरेदी केला, मात्र त्याबदल्यात शेतकऱ्यांना सुमारे ३१ लाख रुपयांची रक्कम न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ३४ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Tomato
Tomato Rate राज्यातील बाजारात वाढले|Tomato Bajarbhav|Agrowon

आठ लाखांची बँक गॅरंटी जप्त

बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या टोमॅटोचे पैसे शेतकऱ्यांना न दिल्याने बाजार समितीने कारवाई केली आहे. परवाने रद्द करण्यासह आठ लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त केली आहे. व्यापाऱ्याने यापेक्षा जास्त रक्कम थकवल्याची माहिती प्राप्त होत आहे. याबाबत बाजार समितीकडे तक्रारी अजून वाढत आहेत. पती व्यापारी व पत्नी आडतदर असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com