
गोंदिया ः जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पुरामुळे धान पिकाचे सर्वाधिक नुकसान (Paddy Crop Damage Due To Flooding) झाले. शासनाच्या निर्देशानुसार मदतीसाठी आवश्यक पंचनाम्याची (Crop Damage Survey) प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे १२ हजार ८२१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले असून ८४ हेक्टरमधील पिके खरडून गेली आहेत. नुकसानीपोटी मदतीसाठी ३० कोटी ६९ लाख रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरिपात १ लाख ७६ हजार हेक्टरवर धानाची, तर ३५ हजार हेक्टरवर इतर पिकांची लागवड करण्यात आली. मात्र या पिकांना अतिवृष्टी आणि पूराचा मोठा फटका बसला आहे. १० ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा हजारो हेक्टरमधील पिकांना फटका बसत ती पाण्याखाली आली. काही शेतकऱ्यांची रोवणी वाहून गेली. परिणामी, त्यांच्यावर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने बाधित क्षेत्राच्या पंचनाम्यांना गती देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने अंतिम अहवाल सादर केला आहे. हा अहवाल आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शासनाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निधी मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा होईल.
तालुकानिहाय्य नुकसान
गोंदिया ६२१५.६३
गोरेगाव ४३६.५२
तिरोडा ३३३२.०५
अर्जुनी मोरगाव ४४२.७३
देवरी २५६.६३
आमगाव १०५६.४६
सालेकसा ६६६.५५
सडक अर्जुनी ४९८.२४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.