Galmukta Dharan : शेतकरी गटाच्या प्रयत्नांमुळे नांदखेडा धरण गाळमुक्त

Galmukt Dam : वाशीम जिल्ह्यातील नांदखेडा येथील स्वराज्य शेतकरी गटाच्या पुढाकाराने धरण गाळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Galmuykta Dharan
Galmuykta DharanAgrowon

Washin News : वाशीम जिल्ह्यातील नांदखेडा येथील स्वराज्य शेतकरी गटाच्या पुढाकाराने धरण गाळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र शासनाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना सुरू केली आहे.

या अंतर्गत मंगरूळपीर उपविभागीय मृद्‍ व जलसंधारण विभाग व कान्होबा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नांदखेडा सिंचन तलावातील गाळाचा उपसा करून ते गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याच्या कामाचा प्रारंभ झाला.

या वेळी कार्यकारी अभियंता एस. पी. आकोसकर उपस्थित होते. अभियानांतर्गत तलावातील गाळ उपसा करण्याच्या कामासाठी अशासकीय संस्थांची नियुक्ती करण्याबाबत शासनाने काढलेल्या आदेशाची माहिती मिळताच स्वराज्य शेतकरी गटाच्या सदस्यांनी सिंचन तलावातील गाळ काढण्याचे काम त्यांच्या संस्थेने हाती घ्यावे अशी विनंती केली. गटातील सदस्यांची इच्छा व तळमळ पाहता त्यांनी काम करण्यास होकार दिला.

या वेळी मृद्‍ व जलसंधारण उपविभागाचे शाखा अभियंता एस. एस. जिरवणकर, पोलिस पाटील भास्करराव जायभाये, पांडुरंग जायभाये, रणजित जायभाये, कान्होबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तुषार जवके, श्री. तोष्णीवाल, स्वराज्य शेतकरी गटाचे सुशील मनवर, संदीप सोनोने, मुमताज मोहम्मद, संतोष डहाणे, प्रवीण मनवर, गजानन जायभाये, मुस्तकिम शाह यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com