Gram Panchayat Election : सरपंचपदाच्या ४७४ जागांसाठी कोल्हापुरात तब्बल २६७७ अर्ज

कोल्हापूर ः जिल्ह्यात सरपंचपदाच्या ४७४ जागांसाठी तब्बल २६७७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. एका गावात सरपंचपदासाठी १२ ते २० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
Gram Panchayat Elections
Gram Panchayat ElectionsAgrowon

कोल्हापूर ः जिल्ह्यात सरपंचपदाच्या (Nomination For Sarpanch) ४७४ जागांसाठी तब्बल २६७७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. एका गावात सरपंचपदासाठी १२ ते २० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक राधानगरी तालुक्यात ६६ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) सरपंचपदांसाठी ३८६ अर्ज दाखल झाले आहेत.

Gram Panchayat Elections
Gram Panchayat Elections : पुणे जिल्ह्यात २२१ सरपंचपदांसाठी १,०५० अर्ज दाखल

या निवडणुकीतील अर्ज माघारीचा ७ डिसेंबर हा शेवटचा दिवस असून, त्याच दिवशी गावागावांतील सरपंच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. केंद्रांकडून थेट ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीच्या खर्चाचे अधिकर सरपंचांना आहेत.

Gram Panchayat Elections
Gram Panchayat Election : वडाळीत ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी

त्यामुळे मोठ्या गावांत या पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. याच टप्प्यात जिल्ह्यातील बहुंताश मोठ्या गावांच्या निवडणुका होत असल्याने आजी-माजी आमदारही यात सक्रिय झाले आहेत. काही गावांत हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्या गावांत पारंपरिक विरोधक एकत्र आले आहेत, तर पूर्वी एकत्र असलेले काही गट या पदावरून एकमेकांविरोधात दंड थोपटण्याची शक्यता आहे.

Gram Panchayat Elections
Gram Panchayats Election : सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ६,९५७ उमेदवारी अर्ज दाखल

सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यासाठी अख्ख्या गावाने या उमेदवाराला मतदान करायचे आहे. मोठ्या गावांत ज्यांची भावकी मोठी त्यांना सरपंच निवडणुकीत महत्त्व आले आहे.

विशेषतः मोठ्या गावांत अशा भावकीतीलच उमेदवार देऊन गठ्ठा मतदान मिळवण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यातही भावकीतील उमेदवार देताना गावांतील इतर गट सांभाळताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com