Potkharaba Land : पुणे जिल्ह्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणणार

पुणे जिल्ह्यात पोटखराब ‘अ’ वर्गातील म्हणजेच नैसर्गिकरीत्या पोटखराब वगळून (नद्या, नाले, वने, डोंगर, ओढा क्षेत्र) जवळ जवळ एक लक्ष हेक्टर आहे. त्यापैकी गायरान, सरकारी पोटखराब वगळता जवळ जवळ सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Potkharaba Land
Potkharaba LandAgrowon

पुणे : जिल्ह्यातील लागवड अयोग्य क्षेत्र लागवडीखाली (Under Cultivation) आणण्यासाठी तहसील व तालुका भूमी अभिलेख (Land Record) कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १५ जानेवारी २०२३ पर्यंत विशेष मोहीम घेण्यात यावी. या मोहिमेच्या कालावधीत २५ हजार हेक्टर पोटखराब क्षेत्र (Potkharaba Land) लागवडीखाली आणावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिल्या आहेत.

Potkharaba Land
Land Survey : बोरविहीर-नरडाणा रेल्वमार्गासाठी नऊ गावांमधील मोजणी पूर्ण

पुणे जिल्ह्यात पोटखराब ‘अ’ वर्गातील म्हणजेच नैसर्गिकरीत्या पोटखराब वगळून (नद्या, नाले, वने, डोंगर, ओढा क्षेत्र) जवळ जवळ एक लक्ष हेक्टर आहे. त्यापैकी गायरान, सरकारी पोटखराब वगळता जवळ जवळ सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये संबंधित शेतकऱ्याला जास्तीची महसूल आकारणी होणार असून, ती देखील नाममात्र स्वरूपाची असणार आहे. यामध्ये अधिकारात व सात-बारावरील नावामध्ये बदल होणार नाही.

Potkharaba Land
Potkharaba Land : पोटखराब क्षेत्र वहिवाटिखाली आणण्याचे प्रस्तावच गहाळ

उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली १ डिसेंबर २०२२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये मोहिमेच्या स्वरूपात कामकाज करण्यात येत आहे. जिल्ह्यात किमान २५ हजार हेक्टर क्षेत्र हे लागवडीयोग्य करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेत संबंधित शेतकऱ्यांच्या पोटखराब क्षेत्राची तलाठ्यांमार्फत पाहणी करून मंडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येत आहे.

Potkharaba Land
Potkharaba Land : पोटखराब क्षेत्राचे प्रस्ताव तातडीने मागविले

मंडल अधिकारी प्राप्त अहवालाच्या आधारे तहसीलदारांना त्रुटीची पूर्तता करून अहवाल सादर करतील. तहसीलदार यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील अहवाल आकारणीसह उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविणे आणि उपविभागीय अधिकारी यांनी अहवालाची यथोचित तपासणी करून आदेश मंजूर करणे या कार्यपद्धतीने कामकाज करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तालुक्याला भेट दिली असून, इतरही तालुक्यांचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आल्याने शेतकऱ्यांना या क्षेत्रात नाममात्र सुधारणा करून जास्तीत जास्त पिके घेता येणार आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अधिक स्वरूपात मिळणार आहे. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊन एकूण कृषी उत्पन्नात वाढ होण्यास मदत असून, या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

- डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com