Nagar Rain Update : नगरमध्ये २५ महसूल मंडलांत महिन्यापासून पाऊस बेपत्ता

Nagar Rain News : सुमारे ६० महसूल मंडलांत २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. उर्वरित मंडळातही पाऊस नाही.
Rain Update
Rain Update Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे परिणाम दिसू लागले आहे. प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार सुमारे २५ महसूल मंडलांत महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून पाऊस बेपत्ता झाला असल्याचे दिसून येत आहे. सुमारे ६० महसूल मंडलांत २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे.

उर्वरित मंडळातही पाऊस नाही. मात्र एखाद दिवशी अल्प पाच ते दहा मिलिमीटर पाऊस पडल्याने खंड पडलेल्या मंडलांत त्याचा समावेश झाल्याचे दिसत नाही. पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरिपाच्या पिकांत मोठी घट येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर, मूग, उडदासारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

Rain Update
Rain Update : अकोला जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सरासरीच्या ७६ टक्के कमी पाऊस

नगर जिल्ह्यात एकूण ९७ महसूल मंडळे आहेत. नगर जिल्ह्यात सुरुवातीपासूनच पाऊस नाही. त्यानंतर सातत्याने पावसाचा खंड पडत आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या नोंदीनुसार नगर जिल्ह्यातील महसूल मंडलांपैकी आत्तापर्यंत वाळकी, रुईछत्तीशी, पारनेर, भाळवणी, वडझिरे, टाकळी, मांडवगण, चिंभळा, देवदैठण, कोंभळी, माही, नेवासा खुर्द, वडाळा, सात्रळ, संगमनेर, आश्वी, शिबलापूर, पिंपरणे, कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, पोहेगाव यांसह अन्य काही महसूल मंडलांत ऑगस्टपासून पावसाचा एकही थेंब पडला नाही.

पावसाचा २१ दिवसांचा खंड पडल्यानंतर पीक विम्याचा पंचवीस टक्के अग्रिम देण्याचा नियम असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहवाल केला आहे. ६० महसूल मंडलांच्या व्यक्तिरिक्त अन्य मंडलातही पाऊस नाही. मात्र सलग खंडात पाच-दहा मिलिमीटर पाऊस पडल्याने सलगच्या खंडात त्या महसूल मंडलांत नावे आली नसली तरी दुष्काळी परिस्थिती आहे.

Rain Update
Rain Update : अकोला, वाशीममध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस

जिल्ह्यात पावणेसहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली खरी, मात्र पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या महसूल मंडलांत अधिक खंड पडला आहे. तेथे मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, बाजरीसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश भागात या पिकांचे ८० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.

खरीप गेला, पावसाचे जवळपास तीन महिने होत आले आहेत, मात्र अजूनही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप तर गेला, नदीनाले, तलाव कोरडे आहेत. परतीचा पाऊस किती होईल याची शंका असल्याने जर पाऊस पुरेसा आला नाही तर रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसाचा खंड पडलेली महसूल मंडले

वाळकी, चास, रुईछत्तीशी (नगर), पारनेर, भाळवणी, वा़डेगव्हाण, सुपा, वडझिरे, टाकळी, पळसी (पारनेर), श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेंडगाव, चिंभळा, देवदैठण (श्रीगोंदा), कर्जत, राशीन, कोंभळी, माही (कर्जत), अरणगाव, खर्डा (जामखेड), शेवगाव, बोधेगाव, एरंडगाव (शेवगाव), पाथर्डी, नेवासाखुर्द, सलाबतपूर, कुकाणा, वडाळा (नेवासा), राहुरी, सात्रळ, तहाराबाद, टाकळीमिया, वांबोरी (राहुरी), संगमनेर, आश्वी, तळेगाव, शिबलापूर, घारगाव, डोळासणे, साकूर, पिंपरणे (संगमनेर), विरगाव, समशेरपूर (अकोले), कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव, पोहेगाव (कोपरगाव), श्रीरामपूर, टाकळीभान (श्रीरामपूर) राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा (राहाता).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com