GI Certification : नवे २३ हजार जीआय वापरकर्ते तयार होणार

भौगोलिक मानांकनाचा (जीआय) दर्जा मिळालेल्या २८ पिकांना देशी व्यापार व विक्रीत प्राधान्य मिळण्यासाठी या पिकांच्या उत्पादकांना नोंदणीकृत वापरकर्ते म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
GI Tagging
GI TaggingAgrowon

Pune News भौगोलिक मानांकनाचा (जीआय) (GI Tagging) दर्जा मिळालेल्या २८ पिकांना देशी व्यापार व विक्रीत प्राधान्य मिळण्यासाठी या पिकांच्या उत्पादकांना नोंदणीकृत वापरकर्ते म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

जीआय पिकांचे (GI Crop) अधिकृत वापरकर्ता म्हणून यंदा राज्यात २३ हजार शेतकऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र मिळवून देण्याची तयारी कृषी विभागाकडून चालू आहे.

जीआय पिकांचे अधिकृत वापरकर्ता शेतकरी सध्या देशभर १० हजार २९० आहेत. त्यातील निम्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास ८ हजार ७५५ शेतकरी एकट्या महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे या विषयात राज्याने घेतलेली आघाडी इतर राज्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

कोणत्याही पिकाला भौगोलिक मानांकन मिळाले तरी त्या भागातील शेतकऱ्यांना लगेच त्याचा वापर करता येत नाही. संबंधित शेतकऱ्याला भौगोलिक मानांकनाचे वापरकर्ता उत्पादक म्हणून नोंदणी प्रमाणपत्र मिळवावे लागते.

GI Tagging
Mango GI: 'जीआय' नोंदणीत हापूस आंब्याचा नंबर दुसरा

राज्यात सध्या जीआयचे वापरकर्ते म्हणून अंजिरासाठी ४८०, चिकू १०६, तर स्ट्रॉबेरीच्या ४० शेतकरी उत्पादकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. डाळिंबासाठी राज्यभरातून ५ हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी १७६६ प्रस्ताव आतापर्यंत मंजूर झाले आहेत.

ऑगस्टअखेर किमान ३ हजार नवे वापरकर्ते राज्यात तयार होतील, असा विश्‍वास कृषी विभागाला वाटतो. त्यासाठी राज्यभर नोंदणी मोहीम हाती घेण्याच्या सूचना फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी क्षेत्रिय यंत्रणेला केली आहे.

GI Tagging
GI Rating Pomegranate : डाळिंबाच्या मार्केटिंगला जीआय मानांकनाचा फायदा

‘फळे, भाजीपाल्यातील २८ पिकांना मानांकन’

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे सल्लागार गोविंद हांडे म्हणाले, ‘‘भौगोलिक मानांकन मिळाल्यास संबंधित पिकाच्या विक्री व्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे फळे, भाजीपाला यातील २८ पिकांना मानांकन देण्यात आले.

यात द्राक्ष, डाळिंब, केसर आंबा, हापूस आंबा, सीताफळ, संत्रा, काजू, कोकम, केळी, बांगी, पांढरा कांदा, लासलगाव कांदा, वाघ्या घेवडा, सांगली हळद, वायगाव हळद, भिवापूर मिरची अशा पिकांना जीआय मिळाल्यामुळे देशविदेशात व्यापार वाढीच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे...

- देशभरात सध्या १० हजार २९० जीआय पिकांचे अधिकृत वापरकर्ता शेतकरी

- निम्म्यापेक्षा जास्त ८ हजार ७५५ शेतकरी एकट्या महाराष्ट्राचे

- जीआयचे वापरकर्ते म्हणून अंजिरासाठी ४८०, चिकू १०६, तर स्ट्रॉबेरीच्या ४० शेतकऱ्यांना प्रमाणपत्र

- डाळिंबासाठी राज्यातील ५ हजारांपैकी १७६६ प्रस्ताव आतापर्यंत मंजूर

- राज्यात ऑगस्टअखेर किमान ३ हजार नवे वापरकर्ते होणार तयार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com