
Pandharpur News : सोलापूरच्या डाळिंबासारखी चव अन्य कुठल्याही भागातल्या डाळिंबाची नाही. सोलापूरचे डाळिंब आजही जगाच्या बाजारात टिकून आहे.
सोलापूरच्या डाळींबाची ही ओळख टिकवायची असेल आणि त्याचे मार्केटिंग उत्तमरीत्या करायचे असेल, तर जीआय मानांकन फायदेशीर आहे, असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी व्यक्त केले.
पंढरपूर येथे आयोजित केलेल्या जीआय मानांकन राज्यस्तरीय प्रशिक्षण व अधिकृत वापरकर्ता प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात डॉ. मराठे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून औषधी वनस्पती मंडळाचे राज्यस्तरीय सल्लागार गोविंद हांडे उपस्थित होते.
तर यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश गायकवाड, डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे माजी अध्यक्ष शहाजीराव जाचक, उपाध्यक्ष प्रतापराव काटे, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, जयवंत कवडे, डाळिंब संघाचे खजिनदार हरिदास थोरात, संचालक बाळासाहेब देशमुख, संघाचे व्यवस्थापक मारुती बोराटे, प्रशांत डोंगरे आदी उपस्थित होते.
डॉ. मराठे म्हणाले, सोलापूरच्या डाळींबाला जगाच्या बाजारपेठेत चांगली मागणी होते. त्यामुळे परराज्यातील डाळिंब आता सोलापूरच्या नावावर खपवले जात आहे, याला प्रतिबंध घालायचा असेल तर सोलापूरच्या डाळिंबासाठी मिळालेल्या जीआय मानांकनाचा उपयोग करून घेतला पाहिजे.
यावेळी भारतीय डाळिंब संशोधन संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, शहाजी जाचक आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, सांगोला तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, मंगळवेढ्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, उदय साळुंखे, प्रशांत काटे, शहाजी घाडगे, अजय आदाटे आदी उपस्थित होते. संघाचे खजिनदार हरिदास थोरात यांनी आभार मानले.
जीआय मानांकन प्रमाणपत्राचे वाटप
सोलापूर जिल्ह्यातील १७६६ शेतकऱ्यांना जीआय मानांकानेचे अधिकृत वापरकर्ता म्हणून प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यातील प्रातिनिधीक शेतकऱ्यांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.