Fraud With Farmer : द्राक्ष व्यापाऱ्यांकडून चार शेतकऱ्यांची २१ लाखांची फसवणूक

Grape Farmer : द्राक्ष खरेदी पोटी धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे.
Grape Farmer Fraud
Grape Farmer FraudAgrowon
Published on: 
Updated on: 

Nashik News : द्राक्ष खरेदी पोटी धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चांदवड, उगाव व कोपरगाव येथील द्राक्ष व्यापाऱ्यांनी सुमारे ४ शेतकऱ्यांची २१ लाख ७९ हजार ३८० रुपयांची फसवणूक केली असून, याप्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी योगेश परसराम भंडारे (रा. कारखाना रोड) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. यामध्ये योगेश भंडारे (११ लाख), बाळासाहेब खंडेराव भंडारे (५ लाख), (धनंजय जगन्नाथ पाटील (३ लाख ५३ हजार), ज्ञानेश्वर भाऊसाहेब भंडारे २ लाख २६ हजार याप्रमाणे एकूण चौघा जणांची फसवणूक झाली आहे.

Grape Farmer Fraud
Fraud With Farmer : डाळिंब खरेदीत १३ लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक

त्यानुसार संशयित व्यापारी आलम आमीन बागवान (रा. बागवान गल्ली, चांदवड), कलीम बागवान (रा. गांधीनगर, कोपरगाव) व वसीम ऊर्फ फिरोज युसूफ शेख आणि बबलू शेख (दोघे रा.उगाव, ता. निफाड) यांनी एप्रिल महिन्यात संगनमताने भंडारे यांच्यासोबत कसबे सुकेणे शिवारातील द्राक्ष माल खरेदीचा व्यवहार केला होता.

Grape Farmer Fraud
Grape Farmer Fraud : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ४२ लाखांची फसवणूक

या व्यवहारात एकूण २५ लाख २९ हजार ३८० रूपयांपैकी ३ लाख ५० हजार रुपये रोख स्वरुपात देण्यात आले होते. तर, उर्वरित २१ लाख ७९ हजार ३८० रुपयांचे एचडीएफसी बँकेचे धनादेश आलम अमीन बागवान बागवान याने दिले होते.

५५ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती

मार्च व एप्रिल महिन्यांत या व्यापाऱ्यांनी द्राक्ष मालाची खरेदी केली आहे. त्यातील फसवणूक झालेल्या चार शेतकऱ्यांच्या वतीने ओझर पोलिस ठाण्यात देण्यात आली. मात्र ओझर, पिंपळगाव परिसरात जवळपास ५५ शेतकऱ्यांची याच व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याची चर्चा आहे.

सुरुवातीला ओळख वाढवून तसेच पत तयार करून व्यवहार केले. काही रक्कम दिली तर बाकी रकमेपोटी धनादेश दिले.मात्र, ते बँकेत न वाटल्याने आमच्या लक्षात आले. आमच्या कष्टाचे पैसे यांनी दिलेले नाहीत त्यामुळे आमचे पैसे मिळावे.
- योगेश भंडारे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कसबे सुकेणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com