Water Shortage
Water ShortageAgrowon

Water Shortage : पाणीटंचाई कामासाठी २ कोटींचा निधी

गेल्या आर्थिक वर्षात पाणीटंचाई निवारण्यासाठी केलेल्या कामांचा निधी आता वर्षभरानंतर आला आहे.
Published on

अकोला ः गेल्या आर्थिक वर्षात पाणीटंचाई (water Shortage) निवारण्यासाठी केलेल्या कामांचा निधी आता वर्षभरानंतर आला आहे. दोन कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत. तेव्हा केलेल्या कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत (Rural Water Supply) निधीची मागणी सातत्याने केली जात होती.

Water Shortage
Tur Pest Management : तुरीवरील किडींचे एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन

उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील सातही तालुक्यांत राहणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईचे चटके जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या निवारण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ३८१ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती उद्‍भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यासाठी ५९० उपाययोजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com