Mahad LandSlide : दरडीच्या कटू आठवणींचा मनात कल्लोळ

18 years of Mahad Landslide : जुलै २००५ मध्ये झालेल्या नुकसानीने महाडकरांच्या डोळ्यात पाणी
Mahad LandSlide
Mahad LandSlideAgrowon
Published on
Updated on

Heavy rain : महाड : ‘शाळा सुटली, पाटी फुटली; आई मला भूक लागली...’ अशी आर्जव आईकडे करणारी ती मुले आता नाहीत. मुलांनाही कोड कौतुकाने खाऊ घालणारी आईदेखील नाही. ती शाळा आजही नेहमीप्रमाणे सुटते आणि भरतेही; परंतु त्या शाळेमध्ये शिकणारी मुले मात्र काळाने कधीच हिरावून नेली. या आठवणी आहेत, महाड तालुक्यातील जुई येथील दरडग्रस्तांच्या.

२५ आणि २६ जुलै २००५ ला महाड तालुक्यातील जुई, रोहन, कोंडीवते व दासगाव या ठिकाणी झालेल्या दरड दुर्घटनेच्या आठवणी आजही काळजाचा ठोका चुकवत आहे. या मोठ्या दुर्घटनेनंतर सरकारचे डोळे उघडले आणि याच दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अमलात आला. यात १९२ जणांचा बळी गेला. कुणी आपले आई-वडील गमावले, तर कोणी भाऊ-बहीण, पिढ्यान पिढ्या वावरलेली घरे जमीनदोस्त झाली. कुणाचे लग्न ठरले होते, तर कुणाचे बाळंतपण जवळ आले होते. एकाच रात्री काळाने हे सारे हिरावून नेले. १८ वर्षांनंतर उरल्या त्या फक्त आठवणी. त्या आठवणीने डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.

Mahad LandSlide
Pali Landslide : पालीवासी दरडीच्या छायेत

मुलांनी लिहिले ‘माझा गाव’वर निबंध

पावसाने कहर केल्याने वलंग येथील माध्यमिक शाळा लवकर सोडून जुई येथील मुलांना घरी पाठवले होते. गृहपाठ म्हणून ‘माझा गाव’ हा निबंध त्यांना लिहायला सांगितला. पण त्याच रात्री जुई गावावर कोसळलेल्या महाकाय दरडीमध्ये १६ मुले दरडीखाली गाडली गेली. पाचवी ते दहावीत शिकणारी ही मुले पाहता पाहता दरडीने गिळंकृत केली. दुसऱ्या दिवसापासून शाळेतील प्रार्थनेला ही मुले नव्हती.

Mahad LandSlide
Mahad Rain Update : महाडमधील नागरिकांचे स्थलांतर

त्यांच्या त्या आठवणीने शाळेतील शिक्षक आजही गहिवरून जातात. वर्गातील बाकांवर ही मुले शिकत असल्याचा भास आजही या शिक्षकांना होतो. १८ वर्षांनंतरही मुलांचे चेहरे त्यांना विसरता येत नाही. दरड काढण्याचे काम संपल्यानंतर काही मुलांच्या मृतदेहाजवळ ‘माझा गाव’ निबंध लिहिलेल्या वह्या सापडल्या होत्या. मुलांनी लिहिलेला तो गाव पुन्हा वसला आहे; परंतु कल्पनेतला गाव निबंध लिहिणारे मुले मात्र नाहीत, ही खंत आजही शाळेचे मुख्याध्यापक आणि तत्कालीन शिक्षक राजन कुरडूनकर यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com