Akola Apmc Election
Akola Apmc ElectionAgrowon

Akola Apmc Election Update : अकोला बाजार समित्यांमध्ये घडामोडींना वेग, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीला महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी सहकार पॅनेलचे वर्षानुवर्षे वर्चस्व राहिलेले आहे.
Published on

Akola News : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा (Akola Agriculture Produce Market Committee Election) रणसंग्राम शिगेला पोचला आहे. सोमवारी (ता.३) उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने एकच गर्दी उसळली होती.

जिल्ह्यात प्रामुख्याने अकोला, अकोट बाजार समित्यांमधील घडामोडींवर जिल्हावासीयांचे सर्वाधिक लक्ष केंद्रित झालेले आहे. अकोल्यात सहकार पॅनेल विरुद्ध वंचित, शेतकरी जागर मंच लढत देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सहकारात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीला (Agriculture Produce Market Committee) महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी सहकार पॅनेलचे वर्षानुवर्षे वर्चस्व राहिलेले आहे.

याहीवेळी पॅनेलकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर विरोधात वंचित बहुजन आघाडी तसेच शेतकरी जागर मंचाकडूनही काही उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी सुरू होती.

Akola Apmc Election
APMC Election : बाजार समिती निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी

त्यानुसार काहींचे अर्ज दाखल झाले आहेत. यापुढील टप्प्यात अर्जांची छाननी तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया राबवली जाईल.

त्यानंतर किती जणांचे अर्ज रिंगणात शिल्लक राहतात, यावर लढत अवलंबून आहे. अकोट बाजार समितीतही या निवडणुकीत मोठे घमासान होणार आहे.

पीएचडीधारक रिंगणात

अकोला बाजार समितीत व्यापारी-अडत्या मतदार संघात पीएचडी झालेले उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. बाजार व्यवस्थेवर डॉ. महेश रमेश मुंदडा यांनी मागील वर्षी पीएचडी केली आहे.

उच्चविद्याविभूषीत उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्यासोबत या मतदार संघात चंद्रकांत पाटील रिंगणात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com