Agri Export : शेती उत्पादनांच्या निर्यातीत १६ टक्के वाढ

देशातील प्रमुख कृषी व प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्यात सुमारे १६ टक्के वाढली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत निर्यात १५.०७ अब्ज डॉलर्सवरून १७.४३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
Agri Export
Agri ExportAgrowon

देशातील प्रमुख कृषी व प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्यात (Agri Export) सुमारे १६ टक्के वाढली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत निर्यात १५.०७ अब्ज डॉलर्सवरून १७.४३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. अपेडा (APEDA) अर्थात कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) ही माहिती दिली आहे.

Agri Export
Food Export : खाद्यान्न निर्यातीत १६ टक्के वाढ

अपेडाने वित्तीय वर्ष २०२२ मध्ये २४.७६ अब्ज डॉलर्स मूल्याची विक्रमी निर्यात केली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी २३.५६ अब्ज डॉलर्स निर्यातीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 

अपेडाने चालू आर्थिक वर्षातील आठ महिन्यांतच ७४ टक्के उद्दिष्ट गाठलं आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीत हीच गती कायम राहण्याची शक्यता असल्याचं अपेडाच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्स  वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. 

Agri Export
Agriculture Export : शेतीमाल निर्यातीत नेतृत्वाची संधी

यासंदर्भात अपेडाचे अध्यक्ष एम अंगमुथू म्हणाले, "भारतातून दर्जेदार कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने निर्यात व्हावीत यासाठी आम्ही शेतकरी, निर्यातदार, प्रक्रियादार यांसारख्या सर्व भागधारकांसोबत काम करत आहोत." 

Agri Export
Pomegranate Export : बांगलादेशकडून ‘एलसी’ मिळेना, डाळिंबाच्या निर्यातीत अडथळे

वाणिज्य मंत्रालयाने म्हटल्याप्रमाणे, गव्हाच्या निर्यातीवर बंदी कायम असतानाही, आधी केलेल्या करारांतील शिपमेंटला परवानगी देण्यात आली होती.

त्यामुळे एप्रिल-नोव्हेंबर या आर्थिक वर्षात निर्यात सुमारे २९ टक्क्यांनी वाढून १.५० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. मागच्या वर्षी निर्यात १.१७ अब्ज डॉलर्स होती. 

बासमती तांदळाची निर्यात सुमारे ३९ टक्क्यांनी वाढली असून ती २.८७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. तर बिगर बासमती तांदळाची निर्यात ५ टक्क्यांनी वाढून ४.२ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

फळांची निर्यात सुमारे ४ टक्क्यांनी वाढून ९९१ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. तर डाळींची निर्यात सुमारे ९० टक्क्यांनी वाढून ३९२ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचल्याचं मंत्रालयाने म्हटलंय. 

प्रक्रिया केलेल्या फळे आणि भाज्यांची निर्यात ९८८ दशलक्ष डॉलर्सवरून १.३१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. तर दुग्धजन्य पदार्थांची निर्यात ३१५ दशलक्ष डॉलर्सवरून ४२१ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. निर्यातीत जवळपास ३४ टक्के वाढ नोंदवण्यात आली. 

पोल्ट्री उत्पादनांची निर्यात ४३ दशलक्ष डॉलर्सवरून ८२ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे.  पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत सुमारे ८८ टक्के वाढ झाली आहे. तर मक्यासह इतर धान्यांची निर्यात सुमारे १३ टक्क्यांनी वाढून ६९९ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. 

अपेडाच्या विविध उपक्रमांमुळे निर्यातीत वाढ झाल्याचे मंत्रालयाने म्हटलं आहे. तसेच विविध देशांमध्ये प्रदर्शने आयोजित करून नवीन संभाव्य बाजारपेठांचा शोध घेण्यात भारतीय दूतावासांचा सक्रिय सहभाग राहिल्याचं देखील मंत्रालयाने म्हटलं आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com