Food Export : खाद्यान्न निर्यातीत १६ टक्के वाढ

शेतीमाल व्यापार : साडेसतरा अब्ज डॉलरची निर्यात
Food Export
Food Export Agrowon

मुंबई ः यंदाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत देशातून शेतीमाल (FarmProduce) आणि प्रक्रिया (Processing) केलेल्या खाद्यपदार्थांची निर्यात (Export) गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात ही निर्यात साडेसतरा अब्ज डॉलर एवढी झाल्याची माहिती केंद्रीय व्यापार मंत्रालयाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ही निर्यात १५ अब्ज डॉलर होती.

Food Export
भारतातून ताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ ; पेरूची निर्यात २६० टक्के वाढली

मार्च २०२३ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात ठरवलेल्या एकूण लक्ष्याच्या ७४ टक्के निर्यात (साडेसतरा अब्ज डॉलर) या आठ महिन्यातच झाली आहे. या पूर्ण आर्थिक वर्षासाठी साडेतेवीस अब्ज डॉलर मूल्याच्या कृषी व प्रक्रिया केलेल्या खाद्यान्न निर्यातीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
प्रक्रिया केलेली फळे व भाज्या यांच्या निर्यातीत या आठ महिन्यात साडेबत्तीस टक्के वाढ झाली. तर ताज्या फळांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या आठ महिन्यांपेक्षा (९५ कोटी डॉलर) या आठ महिन्यांमध्ये चार टक्के वाढ (९९ कोटी डॉलर) झाली आहे. प्रक्रिया केलेल्या फळांची या आठ महिन्यातील निर्यात १३१ कोटी डॉलर एवढी आहे. ती मागील वर्षीच्या आठ महिन्यात ९८ कोटी डॉलर एवढी होती.

Food Export
Pomegranate Export : सततच्या नैसर्गिक आपत्तींचा डाळिंब निर्यातीत ‘खोडा’

शेतकरी, निर्यातदार, प्रक्रिया उद्योजक आदी सर्व लाभधारकांबरोबर सतत प्रयत्न करून खाद्यपदार्थांवर दर्जेदार प्रक्रिया व्हावी आणि गुणवत्तापूर्ण सामुग्री निर्यात व्हावी याची काळजी आम्ही घेतली. त्याचप्रमाणे निर्यातीसाठी नव्या बाजारपेठाही शोधून काढल्या. 
- एम. अंगमुथ्थु, अध्यक्ष, अपेडा

वाढीचा तपशील (टक्क्यांमध्ये)

पोल्ट्री प्रॉडक्ट ८८    
डेअरी प्रोडक्ट ३७  
गहू २९  (११६ कोटींवरून १५० कोटी डॉलर)
बासमती तांदूळ ४०  (२०६ कोटींवरून २८७ कोटी डॉलर)
बिगर बासमती तांदूळ ५  (३९३ कोटींवरून ४१० कोटी डॉलर)

अपेडामुळे निर्यातवाढ
मुख्यतः अॅग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीतर्फे (अपेडा) केलेल्या प्रयत्नांमुळे ही निर्यात वाढल्याचे सांगितले जात आहे. विशिष्ट शेतीमाल व खाद्यान्नाच्या निर्यातवाढीसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये प्रदर्शने भरवणे, आखाती देशांमधील संभाव्य खरेदीदार व भारतीय निर्यातदारांच्या दृक्‌श्राव्य माध्यमांमधून बैठका, परदेशांमधील भारतीय वकिलातींसह केलेले प्रयत्न यामुळे निर्यातवाढ झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com