Solapur DCC Bank : जिल्हा मध्यवर्ती बँकेला १५४ कोटींचा निव्वळ नफा

Latest Agriculture News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात १५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. १५२ कोटीचा संचित तोटा जाऊन दोन कोटी रुपये बँकेकडे शिल्लक राहणार आहेत.
Solapur DCC
Solapur DCC Agrowon
Published on
Updated on

Solpaur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात १५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. १५२ कोटीचा संचित तोटा जाऊन दोन कोटी रुपये बँकेकडे शिल्लक राहणार आहेत. बँकेचा निव्वळ एनपीए १६ टक्क्यांवरून आता १०.७४ टक्क्यांवर आला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज बँकेच्या प्रधान कार्यालयातील लोकनेते बाबूराव (आण्णा) पाटील सभागृहात प्रशासक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीची आकडेवारी देण्यात आली.

लेखापरीक्षणात बँकेला ७१ गुण मिळाले असून ब वर्ग मिळाला आहे. बँकेचा एनपीए पाच टक्क्यांच्या आत आल्यास बँक अ वर्गात जाणार आहे. जिल्हा बँकेच्या ठेवींमध्ये १९२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Solapur DCC
Solapur DCC Bank : आर्थिक दुर्बल घटकांसाठी जिल्हा बँकेची विशेष योजना

बँकेने राज्य सहकारी बँक व नाबार्ड यांच्याकडून काढलेल्या बाहेरील कर्जामध्ये १८ कोटी रुपयांची कपात झाली आहे. बँकेच्या भागभांडवला सात कोटी ते ३३ लाख रुपयांची वाढ झाली आहे. बँकेची थकबाकी ९८७ कोटी वरून ८४२ कोटींवर आली आहे. १४२ कोटी रुपयांची बिगर शेती व शेती कर्जाची थकबाकी कमी झाली आहे.

जिल्हा बँकेच्या वतीने सरसकट सर्वांना पीक कर्ज वाटप करावे, बँकेच्या शेती व बिगर शेती थकबाकीदारांवर वसुलीसाठी कठोर कारवाई करावी अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या.

Solapur DCC
Solapur DCC Bank : थकबाकीमुळे ‘डीसीसी’ची निवडणूक लांबणार?

माढा तालुक्यातील शिवाजी पाटील चांदजकर व जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी यांनी बँकेच्या हिता संदर्भात प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील गटसचिवांना वेतनवाढ व वेतन द्यावे अशीही मागणी करण्यात आली.

हा विषय न्यायालयात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रशासक भोळे व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई यांनी उत्तरे दिली. व्यवस्थापक आर. एन. जाधव यांनी आभार मानले.

कोतमिरे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनचा ठराव

आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी बँकेचे तत्कालीन प्रशासक व सहकार विभागाचे अप्पर आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी ठोस उपाययोजना राबविल्या होत्या. याबद्दल या सर्वांच्या अभिनंदनचा ठराव सर्वसाधारण सभेत झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com