Sarla Bet Development : सरला बेट विकासासाठी १५ कोटींचा निधी

Eknath Shinde : संत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैजापूर येथे केली.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : संत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैजापूर येथे केली.

येथील योगिराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी रविवारी (ता. २७) मुख्यमंत्री शिंदे आले होते. या सोहळ्यास राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, मठाधिपती संत रामगिरी महाराज तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनीही या सोहळ्यास उपस्थिती होती.

Eknath Shinde
Eknath Shinde : नमो योजनेतून १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार : एकनाथ शिंदे

या अभूतपूर्व आध्यात्मिक सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित भाविकांशी ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर करीत संवाद साधण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, आपणा सर्व भाविकांना भेटता आलं हे माझं भाग्य. हरीनाम सप्ताहासारख्या आध्यात्मिक उपक्रमातून संत महात्मे हे चांगल्या गोष्टी शिकवून समाजाचे प्रबोधन करत असतात.

Eknath Shinde
Eknath Shinde : ‘...सहा महिने थांब’ संकल्पना मोडीत काढली : एकनाथ शिंदे

वारकरी संप्रदाय हा अशाच लोकसेवेची शिकवण अंगीकारणारा संप्रदाय आहे. पंढरपूर येथे सुद्धा आषाढी -कार्तिकीला जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा शासन देत आहे.

त्यात सुधारणा करून वारकऱ्यांना अधिक सेवा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. संत गंगागिरी महाराज यांच्या मठाकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद अशा तीनही जिल्ह्यातून लाखो भाविक या सोहळ्यास उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com