Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी १२ हजार ८७३ शेतकऱ्यांकडून पूर्वसूचना

खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी परभणी जिल्ह्यातील १२ हजार ८७३ शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गंत पीकविमा भरपाई मिळावी यासाठी विमा कंपनीकडे पीक नुकसान झाल्याच्या पूर्वसूचना केल्या आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

परभणी : यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात (Khreef Season) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी परभणी (Parbhani) जिल्ह्यातील १२ हजार ८७३ शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गंत पीकविमा भरपाई मिळावी यासाठी विमा कंपनीकडे पीक नुकसान (Crop Damage) झाल्याच्या पूर्वसूचना केल्या आहेत. त्यापैकी ६ हजार ३२२ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे

Crop Insurance
Crop Protection : सूत्रकृमी ओळख, नुकसान अन् उपाययोजना

तर अजून ६ हजार ५५१ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण प्रलंबित आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी, पुरामुळे सर्व नऊ तालुक्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Crop Insurance
Crop Insurance : स्ट्रॉबेरीसाठी आंबिया बहर विमा योजना

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यातील ६ लाख ७१ हजार ५७३ शेतकऱ्यांनी ४ लाख ३८ हजार ८१२ हेक्टरवरील विविध पिकांसाठी २ हजार १७२ कोटी ८६ लाख रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतलेले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ४८ कोटी २५ लाख रुपये एवढा विमा हप्ता कंपनीकडे भरला आहे.

राज्य आणि केंद्र शासनाच्या हिश्श्याचा प्रत्येकी ११९ कोटी ३८ लाख विमा हप्ता आहे. एकूण २८७ कोटी १ लाख रुपये विमा हप्ता आहे. पीकविमा योजनेअंतर्गत पीक संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा भरपाई देण्याची तरतूद आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील १२ हजार ८७३ शेतकऱ्यांनी पूर्वसूचनाव्दारे विमा दावे केले आहेत. गंगाखेड तालुक्यातून सर्वाधिक पूर्वसूचना गंगाखेड तालुक्यातील तर सर्वात कमी पूर्वसूचना पाथरी तालुक्यातील आहेत. पूर्वसूचना दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या पीकनुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय पूर्वसूचना स्थिती

तालुका प्राप्त पूर्वसूचना सर्वेक्षण पूर्ण प्रलंबित सर्वेक्षण

परभणी ८३० १७० ६६०

जिंतूर ३२९० १७८० १५१०

सेलू ५३९ १५१ ३९७

मानवत ३२१ ३४ २८७

पाथरी २४७ ७८ १६९

सोनपेठ ६४६ ४०७ २३९

गंगाखेड ४४१३ २४४१ १९७२

पालम ८११ २६० ५५१

पूर्णा १७६६ १००० ७६६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com