Rabi season News, Parbhani Agri News
Rabi season News, Parbhani Agri News

Rabi Season: परभणीत १०५, तर हिंगोलीत १००.१२ टक्के रब्बी पेरणी

परभणी- हिंगोली जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ४ लाख ४७ हजार ६८५ हेक्टर आहे. या वर्षी (२०२२-२३ ) शुक्रवार (ता. ३०) पर्यंत ४ लाख ६२ हजार ७४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी ः परभणी- हिंगोली जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी (Rabi Sowing Acreage) क्षेत्र ४ लाख ४७ हजार ६८५ हेक्टर आहे. या वर्षी (२०२२-२३ ) शुक्रवार (ता. ३०) पर्यंत ४ लाख ६२ हजार ७४४ हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. त्यात परभणी जिल्ह्यात १०५.४८ टक्के आणि हिंगोली जिल्ह्यात १००.१२ टक्के पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे (Chana Sowing) क्षेत्र सर्वाधिक म्हणजे २ लाख ९६ हजार ७३१ हेक्टर (६४.१२ टक्के) आहे. पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा या दोन जिल्ह्यांतील रब्बीचा पेरा वाढला आहे.

Rabi season News, Parbhani Agri News
Chana Sowing : पुणे विभागात हरभरा पिकाची ९८ टक्के पेरणी

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ असून, यंदा २ लाख ८५ हजार ६३४ हेक्टरवर (१०५.४८ टक्के) पेरणी झाली आहेत. तृणधान्यांची २ लाख पैकी १ लाख १४ हजार ४८१ हेक्टरवर (७४ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ८० हजार ५६० हेक्टर (७१.२४ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी ३२ हजार ९१ हेक्टर (८१.६० टक्के)चा समावेश आहे.

Rabi season News, Parbhani Agri News
Rabbi Crop Sowing : २४ हजार हेक्टरवर करडई आणि १० लाख ८७ हजार हेक्टरवर हरभरा

कडधान्यांची १ लाख १२ हजारा २७२ पैकी १ लाख ६९ हजार ८०९ हेक्टर (१५१.२५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ६९ हजार ७३७ हेक्टरवर (१३९.२५ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांत करडईची ३ हजार ३७१ पैकी १ हजार २६० हेक्टर (३७.३७ टक्के), जवसाची ११९ पैकी ३३.४ हेक्टर (२८.०७ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी १२ हेक्टर (३५.६७ टक्के), सूर्यफुलाची २६.२ पैकी ९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर असून, आजवर १ लाख ७७ हजार ११० हेक्टरवर (१००.१२ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची ५५ हजार ६७९ पैकी ४९ हजार ६७० हेक्टरवर (८९ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीच्या ११ हजार ६९७ पैकी १० हजार २६३ हेक्टर (८७.७४ टक्के), गहू ४२ हजार ५०५ पैकी ३८ हजार ५९५ हेक्टर (९०.८० टक्के) पेरणीचा समावेश आहे.

कडधान्यांची १ लाख २० हजार ३६९ पैकी १ लाख २७ हजार १२३ हेक्टर (१०५.६१ टक्के) पेरणी आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख २० हजार १४७ असताना १ लाख २६ हजार ९९४ हेक्टरवर (१०५.७ टक्के) पेरणी झाली आहे. परभणीतील जिंतूर, मानवत, पूर्णा, हिंगोलीतील हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांत सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र परेणी क्षेत्र सरासरी क्षेत्र

परभणी ५७९०० ५६६०१ ९७.७६

जिंतूर ५३७३० ७०००१ १३०.२८

सेलू ३३५६१ ३१४०३ ९३.५७

मानवत १६११९ १८६५५ ११५.७३

पाथरी १७०७२ १४५५१ ८५.२३

सोनपेठ १५६९८ १५४९४ ९८.७०

गंगाखेड ३२०८६ २९४५० ९१.७८

पालम २०१३० १९५५१४ ९७.०७

पूर्णा २४४९५ २९९३७ १२२.२१

हिंगोली ३१०७४ ३३१९४ १०६.८२

कळमनुरी ५०१४६ ३४५०१ ६८.८

वसमत ४२०१९ ४१३३८ ९८.३८

औंढा नागनाथ २५७२६ ३७१६० १४४.४४

सेनगाव २७९२४ ३०९१७ ११०.७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com