Marathwada Farmers : धक्कादायक! १ लाखांपेक्षा जास्त शेतकरी जीवन संपवण्याच्या विचारात, ही आहेत कारणे

Marathwada Agriculture News: मराठवाडा विभागाचे माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे.
Farmer
FarmerAgrowon
Published on: 
Updated on: 

Maharashtra Government : राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात होत असतात परंतू यावर ठोस उपाययोजना होत असताना दिसत नाही. दरम्यान मराठवाडा विभागाचे माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे.

मराठवाडा विभागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यांत एक सर्व्हे केला होता. यातून तब्बल १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

केंद्रेकर यांनी पाच लाख कुटुंबांचे १२ टप्प्यांत आणि १०० प्रश्न तयार करून हा सर्व्हे केला होता. यातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच हा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान हा सर्वेक्षण करण्यात आले होते यावेळी १० लाख शेतकऱ्यांची माहिती घेण्यात आली होती. या सर्वेक्षणात प्रश्नांचे एकूण १२ विभाग करण्यात आले होते. तर एकूण १०४ प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरण्यात आली. यात मराठवाड्यात आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली होती.

तर मराठवाडा विभागामध्ये १० लाख शेतकरी कुटुंबांपैकी १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी कुटुंबांची अतिसंवेदनशील यादी करण्यात आली होती. तर २ लाख ९८ हजार ५१ शेतकरी कुटुंबे संवेदनशील असल्याचीही माहिती नमूद करण्यात आली आहे.

शासनाने शेतकरी आत्महत्याप्रकरणी अनुदान देताना जे निकष लागू केला आहे. यामध्ये कर्जबाजारीपणा, नापिकी व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या तीन कारणांव्यतिरिक्त इतरही अनेक कारणे असल्याची माहिती समोर आली आहे.

Farmer
Weather Update : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा| ॲग्रोवन

अतिसंवेदनशीलमध्ये कोण?

१० लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ७५ पेक्षा जास्त गुण असलेल्या शेतकरी कुंटुंबांना अतिसंवेदनशील विभागात नोंदवण्यात आले तर ५० पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना संवेदनशील विभागात समावेश करण्यात आले.

सर्वेक्षणात आढळलेली आत्महत्येची कारणे

माजी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या सर्वेक्षणानुसार, औरंगाबाद विभागात सन २०१२ ते २०२२ या कालावधीत एकूण ८ हजार ७१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ९२३ जणांचा नापिकीमुळे, १ हजार ४९४ कर्जबाजारीपणामुळे, ४ हजार ३७१ नापिकी व कर्जबाजारीपणा या दोन्ही एकत्रित कारणांमुळे, तर २ हजार कर्ज परतफेडीच्या तगाद्यामुळे आणि १ हजार ९२९ इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com