Turmeric Variety : कमी कालावधीच्या वायगाव हळदीचा मिळाला पर्याय

Turmeric Production : विदर्भातील रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना सात महिन्यांत येणाऱ्या व कमी पाण्यात साधणाऱ्या पीडीकेव्ही वायगावसारख्या हळद वाणाचा पर्याय मिळाला आहे.
Turmeric
Turmeric Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : विदर्भात वाशीम जिल्हा हळद उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सेलम व अन्य वाणांची लागवड होते. यंदा हळदीला विक्रमी दर मिळत असल्याने हे पीक पुन्हा मुसंडी मारण्याची शक्यता आहे.

अलीकडील वर्षांत करडा कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पीडीकेव्ही वायगाव या हळद वाणाचा प्रसार केला आहे. येथील उद्यान विद्यावेत्ता निवृत्ती पाटील म्हणाले, की या भागात ऑक्टोबर- नोव्हेंबरनंतर पाणी कमी होऊ लागते.

मार्चमध्ये हळद काढणीवेळी एक- दोन पाणी कमी पडले तर उत्पादनात घट यायची. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पिकाखालील क्षेत्र कमी केले. त्यामुळे हळदीच्या कमी कालावधीच्या वाणांचे प्रयोग आम्ही केले. त्यातून उत्पादन, दर यांच्या निकषांवर पीडीकेव्ही वायगाव हळद उजवी ठरली.

तालुक्यातील आसेगाव पेन येथील योगेश खानझोडे यांनाही केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली या वाणाचे अधिक व दर्जेदार उत्पादन घेतले. त्याची प्रेरणा अन्य शेतकऱ्यांना मिळाली. पूर्वी वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातच घेतली जाणारी वायगाव हळद आता वाशीममध्ये विस्तारते आहे.

खानझोडे यांची हळद शेती

एकत्रित कुटुंबातील युवा शेतकरी योगेश खानझोडे यांची १६ एकर शेती आहे. सात- आठ वर्षांचा त्यांचा हळद पिकातील अनुभव आहे. सेलम वाणाची एकरी ३० ते ३६ क्विंटलपर्यंत उत्पादकता त्यांनी टिकवली आहे.

याच शेतीतून त्यांनी गावात चांगले घर बांधले. कुटुंबातील लग्नसोहळे केले. सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा वाढली. आज हळद पिकातील मास्टर व प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना वडील विनोद, काका दीपक व कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन मिळते. सर्वजण सामूहीक राबतात.

Turmeric
Turmeric Market: हळदीचे भाव आणखी वाढणार? काय राहील भविष्यात स्थिती?

व्यवस्थापनातील बाबी

एकूण शेतीत संत्रा, सोयाबीन. दोन एकरांत हळद.

एक एकर सेलम वाण. अलीकडील चार वर्षांपासून एक एकर पीडीकेव्ही वायगाव

मातृकंदाचा लागवडीसाठी वापर. सुमारे ४० ग्रॅम वजनाच्या निरोगी बेण्याची निवड.

गादीवाफा पद्धतीने लागवड.

ठिबकद्वारे गरजेनुसार मोजकेच पाणी.

दरवर्षी उल्लेखनीय उत्पादन घेताना मातीचा पोत टिकवला.

दरवर्षी पीक फेरपालट. लागवडीपूर्वी एकरी ४ ते ५ ट्राॅली शेणखताचा दरवर्षी वापर.

गुजरातमधील एका गोशाळेतून गीर गायीपासून बनविलेले कल्चर उत्पादन त्यांना मिळते. दोन किलो गूळ, दोन लिटर देशी ताक व हे कल्चर एक ते दोन लिटर यांचे मिश्रण करून दोनशे लिटरची टाकी तयार केली जाते. सात ते आठ दिवस ढवळून तयार झालेल्या द्रावणाचा ठिबकमधून महिन्यातून एकदा वापर.

हळदीचे पीक सेंद्रिय खतांना उत्तम प्रतिसाद देते. त्यामुळे रासायनिक निविष्ठांचा अत्यंत कमी वापर. गांडूळ खत, कुजलेले शेणखत, जिवामृत यांचाही वापर.

उत्पादन (एकरी)

सेलम वाण- ३०, ३४ ते ३७ क्विंटल.

वायगाव- एकरी २५ क्विंटलपर्यंत.

उत्पादन खर्च- सुमारे ७० हजार ते ८० हजार रु.

दर (रु. प्रति क्विंटल)

वाण- सेलम - शक्यतो हिंगोली बाजारपेठेत विक्री.

२०२०-२१ ७०००

२०२१-२२ ८१००

२०२२-२३ १३, २००

वाण- पीडीकेव्ही- अलीकडील वर्षांत- ९८०० ते १० हजार रु. (वर्धा तालुक्यात विक्री.)

Turmeric
Turmeric Market : हळदीच्या तेजीला वायदे बाजार पोषक

पीडीकेव्ही वायगाव उत्पादनासंबंधी

वीस किलो बेण्यापासून सुरुवात करीत यंदा हे क्षेत्र एक एकर.

केव्हीकेच्या मार्गदर्शनात २०२० मध्ये प्रयोगांतर्गत २० किलो बेण्याची लागवड करून सुमारे २.१० क्विंटल बेणे तयार केले.

सन २०२०-२१ मध्ये ६ ते ७ गुंठ्यात लागवड. त्यातून २० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन.

सन २१-२०२२ मध्ये २० गुंठ्यात ओल्या हळदीचे ७२ क्विंटल उत्पादन.

अन्य पिके व उत्पादन

पाच एकरांत हरभरा लागवड. एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन.

या हंगामात दोन एकरांत कांदा बीजोत्पादन. एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन.

गव्हाचे १७ ते १८ क्विंटल एकरी उत्पादन.

पीडीकेव्ही वायगाव वाणाची वैशिष्ट्ये

पीक कालावधी सात महिन्यांचा. त्यामुळे जानेवारीत काढणी झाली, तर दुबार पीक घेणे शक्य होते. योगेश यांनी त्याप्रमाणे गहू, कांदा ही पिके घेतली.

या वाणात कुरकुमीनचे प्रमाण ५.५ ते ६.५ टक्के राहते. सेलम वाणात हे प्रमाण साडेतीन ते चार टक्क्यांपर्यंत.

९० टक्के झाडांना फुले येतात

पानांना तीव्र सुवास असतो

एक क्विंटल ओल्या हळदीपासून २० ते २२ किलो सुकवलेली हळद मिळते.

हळकुंडे लांब, प्रमाणबद्ध. गाभा गर्द पिवळा.

वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात अधिक क्षेत्र.

केव्हीकेने घेतलेल्या प्रयोगात कमाल एकरी २५ ते २७ क्विंटलपर्यंत उत्पादन रिसोड भागातील हवामानात मिळाले.

योगेश खानझोडे ७२१८४३५००९

निवृत्ती पाटील, ९९२१००८५७५ (उद्यानविद्या विषय तज्ज्ञ)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com