Desi Cow Rearing : जनावरांच्या माध्यमातून केला आर्थिक उत्पन्नाचा पाया भक्‍कम

Dairy Business : देशी गोसंगोपनावर आधारित शेती पध्दतीतून आमगाव मदनी (ता. सेलू, जि. वर्धा) येथील नंदकिशोर गावंडे यांनी उत्पन्नाचे स्रोत बळकट करताना शेती व कुटुंबाचे अर्थकारण उंचावले आहे.
Desi Cow Rearing : जनावरांच्या माध्यमातून केला आर्थिक उत्पन्नाचा पाया भक्‍कम
Agrowon
Published on
Updated on

विनोद इंगोले

Milk Production : देशी गोसंगोपनावर आधारित शेती पध्दतीतून आमगाव मदनी (ता. सेलू, जि. वर्धा) येथील नंदकिशोर गावंडे यांनी उत्पन्नाचे स्रोत बळकट करताना शेती व कुटुंबाचे अर्थकारण उंचावले आहे. गवळाऊ गायीच्य संगोपनातून प्रक्रियायुक्त पदार्थांचे उत्पादन, शेणापासून विविध उत्पादने घेताना सेंद्रिय शेतीलाही चालना देत थेट ग्राहक बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

मूळ अकोला जिल्ह्यातील खेर्डाभागाई गावचे नंदकिशोर गावंडे सामाजिक संस्थेत वर्धा जिल्ह्यात काम करायचे. सन २००३ मध्ये त्यांनी संस्थेचे काम थांबवले. नंतरच्या काळात त्यांचा संपर्क काही गोशाळांशी आला. त्यातूनच गोसंगोपनाविषयी आपुलकी वाढली. दरम्यानच्या काळात काही गोशाळा भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतल्या. याच जिल्ह्यातील आमगाव मदनी गावचा परिसर हा वनव्याप्त आहे. येथे गोपालन व सेंद्रिय शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते असे त्यांना वाटले. याच भागात काही शेती घेत गवळाऊ गाईंचे संगोपन सुरू केले. आज वीस वर्षे झाली. गावंडे याच गावी स्थायिक झाले असून, पूर्णवेळ सात एकर शेती व दुग्ध व्यवसायात रमले आहेत.

जातिवंत गवळाऊ संगोपन

गवळाऊ ही वर्धा जिल्ह्यातील गायीची जात आहे. त्याचे बैल काटक असतात. परिणामी, त्यांचा शेतीकामी चांगला उपयोग होतो. आर्वी, आष्टी, कारंजा या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी या जातीचे संगोपन केले आहे. त्यांच्यापासूनच जातिवंत गायींची खरेदी केल्याचे गावंडे सांगतात. गाय प्रत्येकी २० ते ४० हजर रुपये, तर बैलजोडी ६० ते १ लाख रुपयांना मिळते. सध्या दहा गायींचे संगोपन सुरू आहे. गावंडे यांच्याकडील गायी प्रति दिन चार ते आठ लिटरपर्यंत दूध देतात.

दुग्धोत्पादने

दुधावर प्रक्रिया करून त्याच्या मूल्यवर्धनामुळे उत्पन्नात वाढ होते या उक्तीनुसार गावंडे विविध उत्पादने तयार करतात. महिन्याला आठ किलो तूप उत्पादन होते. २५०० रुपये प्रति किलो दराने ते विकले जाते. सण उत्सवाच्या काळात मागणीनुसार पनीर, खवा, पेढा आदी पदार्थ तयार केले जातात. सुमारे सव्वा सहा किलो दुधापासून एक किलो पनीर, तर सव्वापाच लिटर दुधापासून एक किलो खवा मिळतो. महिन्याला सुमारे ३० किलो खवा उपलब्ध होतो. बासुंदीची ४०० रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जाते.

Desi Cow Rearing : जनावरांच्या माध्यमातून केला आर्थिक उत्पन्नाचा पाया भक्‍कम
Desi Cow Rearing : लाल कंधारी गोवंश संवर्धन आणि संगोपन

शेणापासून गणपती मूर्ती

गावडे यांनी केवळ दुग्धोत्पादनांवर भर दिलेला नाही. तर शेणापासून ते गणपतीची मूर्ती, शोभिवंत वस्तू व गोवऱ्यादेखील तयार करतात. त्यापासून अतिरिक्त उत्पन्न ते मिळवितात. यंदा त्यांनी १६० गणपती मूर्ती तयार केल्या. पैकी १०० मूर्तींची विक्री झाली. कारमध्ये ठेवण्यासाठी गणपतीच्या छोट्या मूर्ती ते बनवितात. त्यांनाही चांगली मागणी आहे. शेणापासून फ्रेम, तोरण, आरसा, दिवे अशा गृहसजावटीच्या वस्तूही तयार केल्या जातात. सण-उत्सवांच्या काळात तसेच प्रदर्शने, महिला बचत गट आदींच्या माध्यमातून त्यांना चांगली मागणी असते. अर्थात, उत्पादन हे मागणीनुसार पुरवठा या तत्त्वानुसार केले जाते. गावातील महिलांनाही त्यातून रोजगार मिळतो.

Desi Cow Rearing : जनावरांच्या माध्यमातून केला आर्थिक उत्पन्नाचा पाया भक्‍कम
Sheep Rearing : मेंढीपालनातून मिळवला शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत

गोवऱ्या व गोमूत्र अर्क

शुद्धतेच्या निकषांवर ताडपत्रीवर गोवऱ्या तयार करण्यात येतात. होमहवन किंवा अन्य कारणांसाठी त्यांना शहरातील गोरख मंदिरालगत असलेल्या पूजा साहित्य व्यावसायिक वा अन्य व्यक्तींकडून मागणी असते. फेब्रुवारी ते मे या कालावधीतच गोवऱ्यांचे उत्पादन केले जाते. दिवसाला २०० या प्रमाणे चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे २२ हजार ते २४ हजार गोवऱ्या तयार केल्या जातात. प्रति चार रुपये दर अपेक्षित धरता या हंगामात ९६ हजार रुपयांचे उत्पन्न हाती पडते. शुद्ध स्वरूपाच्या गोमूत्र अर्काची ३०० रुपये प्रति लिटर दराने महिन्याला सरासरी ८५ ते ९० लिटर संख्येने विक्री होते. वर्धा, नागपूर या ठिकाणी पुरवठा होतो.

इंधनात स्वयंपूर्णता

गावंडे यांच्याकडे चार जैवइंधन अर्थात बायोगॅस प्रकल्प आहेत. पैकी दोन प्रकल्पांचा
वापर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी होतो. एका प्रकल्पाबाबत बोलायचे तर २० ते २५ किलो गोबरच्या माध्यमातून दररोज आठ तास पुरेल एवढे स्वयंपाकसाठीचे इंधन तयार होते. बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून ९० टक्‍के अनुदान या प्रकल्पांना मिळाले आहे. परिणामी, ऊर्जेच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण झालो असल्याचे गावंडे यांनी सांगितले.

सेंद्रिय उत्पादन

शेणाचा मुबलक वापर करून गावंडे यांची आपली शेती सेंद्रिय होण्याला प्राधान्य दिले आहे. लिंबाची ४००, आवळा व सीताफळाची प्रत्येक १०० झाडे, तसेच सोयाबीन, कपाशी, हळद आणि भाजीपाला अशी त्यांची पीक पद्धती आहे. व्यापाऱ्यांना विक्री होतेच. शिवाय थेट शेतातूनही ग्राहक घेऊन जातात.

नंदकिशोर गावंडे, ९२२६२६९२५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com