Goat Farming : शेळीपालन, पोल्ट्रीतून उंचावली अर्थव्यवस्था

Poultry Farming : पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भिवरी येथील अनिल ढवळे यांनी शेतीला पूरक म्हणून शेळीपालन सुरू केले. टप्प्याटप्प्याने विस्तार करीत कुटुंबातील सर्वांच्या श्रमातून व्यवसायात यश व स्थिरता मिळवली आहे.
Goat Farming
Poultry Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यातील पुरंदर हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. अंजीर, सीताफळ आणि अलीकडील काळात पेरूच्या बागांसाठीही हा भाग परिचित झाला आहे. तालुक्यातील भिवरी गावातील अनिलढवळे परिवाराची एकत्रित पाच एकर शेती आहे. त्यात प्रत्येकी ३० गुंठे पेरू, सीताफळ आणि अंजीर या फळपिकांसह सोयाबीन, वाटाणा, पावटा, भाजीपाला पिके असतात.

सातत्याने पाण्याची टंचाई उद्भवत असल्याने उत्पन्नावर मर्यादा असतात. त्यामुळे केवळ पिकांवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. त्यामुळे शेतीला पूरक म्हणून ढवळे यांनी २०१८ च्या ? सुमारास शेळीपालन करण्याचे ठरवले. तत्पूर्वी फलटण येथील निंबकर फार्म, वाघोली येथील पूना गोट फार्म अशा विविध फार्म्सना भेटी दिल्या. अर्थकारण, बाजारपेठ, अडचणी या बाबी समजून घेतल्या.

शेळीपालनातील प्रगती

यवत (ता.दौंड, जि. पुणे) येथील आठवडे बाजारातून दोन व्यालेल्या शेळ्या आणि दोन पिल्ले खरेदी केली. शेतातील गायीच्या गोठ्यातच संगोपन सुरू केले. पुढे पिल्‍ले मोठी करून विक्री केली. त्यानंतर निंबकर फार्म येथून बोअर जातीचे दोन बोकड आणले. त्यांना वाढवून बकरी ईदवेळी स्थानिक बाजारात विक्री केली.

हळूहळू व्यवसायात आत्मविश्‍वास येऊ लागला. मग खेड शिवापूर येथूनदोन शेळ्या व पाच बोकड घेतले. आत्तापर्यंतच्या मिळालेल्या उत्पन्नातून व घरातील रकमेतून गोठ्याचे विस्तारीकरण केले. आज ६० बाय ३० फूट आकाराचे हे शेड आहे.

पूर्वी काही शेळीपालकांकडे पाहिल्यानुसार अर्धबंदिस्त पद्धतीने त्याची रचना केली. विविध वयाच्या आणि जातींच्या शेळ्यांसाठी स्वतंत्र कप्पे (कंपार्टमेंटस) केले. त्यामध्येच त्यांना पाणी आणि खाद्य दिले जाते. सकाळी व संध्याकाळी काही वेळ त्यांना मुक्त संचार वातावरणात सोडले जाते. त्यातून

Goat Farming
Goat Sheep Farming : ‘शेळी-मेंढीपालन’ठरेल प्रगतीचे इंजिन

व्यवस्थापनातील बाबी

सध्या शेळ्या, मेंढ्या, बोकड, पिल्ले अशी सर्व मिळून ५० पर्यंत संख्या आहे. सोजत, बिटल, सिरोही, बोल्‍हाई अशा विविध जातींची विविधता ठेवली आहे. सकाळी सात ते साडेआठ पर्यंत शेडची स्वच्छता केली जाते. सकाळी अकराच्या दरम्यान खाद्य देण्यात येते.

दुपारी शेळ्या, मेंढ्या आराम करतात. संध्याकाळी पाच वाजता पुन्हा शेडची स्वच्छता करून, हरभरा, कडबा कुट्टी आदी खाद्य देण्यात येते. पिल्लांना शेतातील हिरवा चारा देण्यात येतो. शेळ्यांना होणाऱ्या रोगांची जोखीम लक्षात घेऊन त्यांचा विविध रोगांसंबंधीचा लसीकरण कार्यक्रम दक्षतेने राबवला जातो. मरतुकीचे प्रमाण जवळपास नाही.

जागेवर तयार केली विक्री व्यवस्था

सोजत जातीची शेळी रंगाने पांढरी, चपळ आणि सुंदर असल्याने बाजारपेठेत तिला चांगली मागणी असते. बकरी ईदच्या काळात सर्व जातीच्या ३५ ते ७० किलो वजनी बोकडांना चांगली मागणी असते. तर मेंढ्यांची सण, जत्रा- यात्रा आदींवेळी खरेदी केली जाते.

एक वर्षाच्या पुढील नराला २० हजारांपासून ते ३५ हजार रुपयांपर्यंत तर शेळीला १५ हजार ते २० हजार रुपये दर मिळतो. वर्षभरात ३० ते ४० च्या संख्येपर्यंत एकूण विक्री होते. या व्यवसायात सुमारे साडेचार लाख ते पाच लाखांपर्यंत उलाढाल होते.

Goat Farming
Poultry Farming : आधुनिक पद्धतीने गावरान कुक्कुटपालन

मिळाले आर्थिक स्थैर्य

शेती व सर्व पूरक व्यवसायांमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य राबतात. त्यामुळेच कामाची व श्रमांची विभागणी होऊन त्याचा सर्वांना फायदा होतो. अनिल यांना पत्नी योगिता, भाऊ सुनील, त्यांची पत्नी सपना व आई बायडाबाई यांचे सहकार्य असते. सुट्टीच्या काळात मुले देखील गोठ्याची स्वच्छता व अन्य कामांमध्ये मदत करतात. पेरू आणि सीताफळ पीक हवामानाच्या लहरीपणामुळे बेशभरवशाचे उत्पन्न देत होते. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक डोलारा विस्कळित होत होता.

शेळीपालन व जोडीला पोल्ट्री फार्म उभारल्यामुळे आर्थिक स्थैर्य आले. याच व्यवसायांमधून शेडचा विस्तार करणे शक्य झाले. वर्षभरातील दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण यांना आर्थिक आधार झाला आहे असे अनिल यांनी सांगितले.आत्तापर्यंत कोणतेही कर्ज न घेता अनिल यांनी शेती व व्यवसायांचा आर्थिक मेळ घातला आहे.

येत्या काळात शासकीय योजनांसह कर्ज घेऊन व्यवसायात आधुनिकता आणण्याचे नियोजन आहे. गोठा उभारणीसाठी पाच लाखांची गुंतवणूक केली जाणार आहे. दहाहजार संख्येपर्यंत पक्षी क्षमता असलेल्या पोल्ट्री उभारणीसाठीही १५ लाखांचे नियोजन केले आहे. शंभरांपर्यंत संख्या असलेले शेळीपालन करून दुमजली शेड उभारणी केली जाणार आहे.

अनिल ढवळे ९८५०८२७०८५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com