Silk Farming : आदिवासी पट्ट्यात रुजतेय रेशीम शेतीची चळवळ

Article by Mukund Pingle : रोजगाराचा प्रश्नावर मात करण्यासाठी साप्ते (ता. त्र्यंबकेश्वर) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत 'श्रीगणेशा' गट स्थापन केला. त्यातून येथे रेशीमशेतीची चळवळ रुजली आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी प्रामुख्याने पारंपारिक पद्धतीने शेती करतात. सिंचनाची अल्प सुविधा आणि जिरायती पीकपद्धती यामुळे दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर ठरलेले. रोजगाराचा प्रश्नावर मात करण्यासाठी साप्ते (ता. त्र्यंबकेश्वर) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत 'श्रीगणेशा' गट स्थापन केला. त्यातून येथे रेशीमशेतीची चळवळ रुजली आहे.

जलसंधारण कामासाठी अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि महिंद्रा ॲण्ड महिंद्रा यांच्या सहकार्याने कश्यपी धरणातून दोन बंधाऱ्यातील गाळ उपसून त्यांची दुरुस्ती करण्यात आली. बंधाऱ्याचे काम झाल्यानंतर पाणी साठवणूक क्षमता वाढली. येथील गाळ वाहून नेत शेतकऱ्यांनी बांधबंदिस्ती केली. तर काही शेतकऱ्यांनी गाळ जमिनीत मिसळला.

Silk Farming
Silk Farming : रेशीमशेती ठरली शाश्वत उत्पन्नाचा स्रोत

जून २०२३ पासून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला सुरवात केली आहे. जिल्हा रेशीम कार्यालयातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन केले आहे. शेतकऱ्यांनी शास्त्रीय माहिती समजून घेत रेशीम कोष उत्पादनास सुरवात केली. तयार कोषाची विक्री बीड येथे प्रतिकिलो ३४० रुपये प्रमाणे करण्यात आली.

Silk Farming
Silk Farming : रेशीम उद्योगविषयक परिषदेचे फेब्रुवारीत आयोजन

आलेल्या उत्पन्नातून नफा वाटून न घेता व्यवसाय वाढीसाठी भांडवल एकत्र करून वाढविले आहे, अशी माहिती श्रीगणेशा पुरुष बचतगटाचे प्रमुख शांताराम चौधरी यांनी दिली. रेशीम शेतीमुळे रोजगारासाठी स्थलांतर कमी होईल असे सकारात्मक चित्र तयार होत आहे. रेशीम शेतीच्या विस्तारासाठी अभिव्यक्ती संस्थेचे भिला ठाकरे, सुचेता कुलकर्णी, भिकन दंडगव्हाळ,रणजित गाडगीळ यांचे सहकार्य लाभले आहे.

ग्रामविकासासह होतोय कृषिविकास

पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी एक एकरावर तुती लागवड केली. तसेच कीटक संगोपनगृहाची उभारणी केली. ग्रामविकासासह कृषिविकास साधण्यासाठी संस्थेने गावातील ४० शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ केसर आंबा कलमे दिली आहेत.संस्थेने आदिवासी शेतकऱ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आंबा कलम निर्मिती,गांडूळ खत निर्मिती,अळिंबी उत्पादन तसेच तुती लागवड व संगोपन, रेशीम कीटक संगोपन, कोष संकलनाबाबत प्रशिक्षण दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com