Organic Jaggery Production : सेंद्रिय शेतीच्या गरजेतून 'चिनूराज' गूळाच्या ब्रँडची निर्मिती

Organic Farming : सेंद्रिय शेतीत निविष्ठा तयार करताना गुळाची कमतरता भासू लागली. त्यातून घरच्या उसापासून गूळनिर्मितीची कल्पना पुढे आली.
Organic Jaggery Production
Organic Jaggery ProductionAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हळदीसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील किसन वीर ऊस कारखान्यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर किकली गाव आहे. कॅनॉल व विहिरीच्या पाण्यावर हळद, ऊस आदी पिके येथे घेतली जातात.

गावातील युवा शेतकरी सचिन जगन्नाथ बाबर यांची अडीच एकर शेती आहे. दहावीनंतर आयटीआय येथे ‘इलेक्र्टिक’ शाखेतील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कारखान्यात ते वायरमन म्हणून कार्यरत झाले. नोकरी आणि शेती अशा दोन्ही आघाड्यांवर लढून कुटुंबाचे अर्थकारण पुढे नेण्याची त्यांची धडपड सुरू आहे.

सेंद्रिय शेतीने दिली गूळनिर्मितीची संधी

सचिन यांना सेंद्रिय शेतीची आवड आहे. जमिनीचे तसेच मानवी आरोग्यासाठी आपण ही शेती करणे आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी पुण्यात प्रशिक्षण घेतले. सन २०१४ च्या सुमारास सेंद्रिय शेतीला आरंभ केला.

घरी देशी गाय होती. त्यात वाढ करत संख्या चारपर्यंत नेली. शेतातच जिवामृत व अन्य निविष्ठा तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी गुळाची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती. घरच्या शेतीतून तेवढा गूळ उपलब्ध होत नव्हता.

अन्यत्र त्याचा शोध सुरू केला. त्या वेळी कारखान्यातील सहकाऱ्यांनी तूच तुझ्या घरच्या शेतीतील उसापासून गूळ तयार कर असे सुचविले. हा गूळ आम्ही देखील खरेदी करू असा विश्‍वास दिला. सचिन यांना ही संकल्पना पटली.

Organic Jaggery Production
Organic Jaggery Production : सेंद्रिय गूळ निर्मितीसह चहा, फ्रॅंचायसी, मॉलची साखळीही

व्यावसायिक गूळ निर्मिती

सचिन यांचे अडीच एकरच क्षेत्र आहे. तेवढ्यातच त्यात विविध पिकांचे नियोजन करावे लागते. सेंद्रिय शेतीसाठी दोन देशी व एका सहिवाल गायीचे संगोपन केले जाते. तीस गुंठ्यांत हळद, त्यानंतर सुरू ऊस, त्याचा खोडवा अशी फेरपालट वा चक्राकार पद्धती विकसित केली आहे.

सुरुवातीला साडेतीन टन उसापासून मग सहा- सात टन, अकरा टन उसापासून असे करीत टप्प्याटप्प्याने वीस टन उसापासून गूळनिर्मिती सुरू केली. अनुभवातून एकेक गोष्ट शिकत त्यात हातोटी तयार होऊ लागली. ऊस सेंद्रिय असल्याने गुळाला चव चांगली येत होती. मित्र परिवार तसेच पै-पाहुण्यांकडून गूळ खरेदी होऊ लागला.

Organic Jaggery Production
Organic Jaggery : सेंद्रिय गूळ, हळदीचा तयार केला ब्रॅण्ड

मग सचिन यांचा उत्साह वाढला. त्यानंतर व्यावसायिक पद्धतीने गूळ निर्मिती व विक्रीचे नियोजन या महत्त्वाच्या टप्प्यात ते उतरले. टिकवलेले सातत्य, चिकाटी, आढळलेल्या त्रुटी, त्यातून नव्या सुधारणा, घेतलेला ध्यास, व्यवसायातील प्रामाणिकपणा यांचे फळ दहा वर्षांच्या अभ्यासपूर्ण अनुभवातून आज हाती येऊ लागले आहे.

आज तीस गुंठ्यांत सुमारे २५ ते ३२ टनांपर्यंत उसाचे उत्पादन मिळते. त्यापासून तीन ते साडेतीन टन गूळ तयार होतो. जोशीविहीर येथील मित्र नितीन चव्हाण यांचे ‘हायजेनिक स्वरूपाचे स्टेनलेस स्टील गुऱ्हाळ घर आहे. तेथे स्वतःच्या देखरेखीखाली सचिन गूळ तयार करून घेतात. गूळनिर्मितीची प्रक्रिया देखील पूर्णपणे सेंद्रिय असते.

ब्रॅण्ड

मोठा मुलगा चिन्मय व धाकटा मुलगा अनुराज यांच्या नावाच्या एकत्रीकरणातून चिनूराज हा ब्रॅण्ड तयार केला आहे.

बदलती बाजारपेठ व ग्राहकांची मागणी ओळखून एक व पाच किलो ढेप, चार ग्रॅम, पाच ग्रॅम, दहा ग्रॅम व १५ ग्रॅमच्या क्यूब्ज व गूळ पावडर, काकवी अशी उत्पादने तयार केली जातात.

‘फूड सेफ्टी’ विषयातील ‘एफएसएसएआय’ तसेच सेंद्रिय शेतीचे पीजीएस प्रमाणपत्र घेतले आहे.

फक्त स्वतःच्या शेतातील उसाचे गाळप करून गूळ तयार केला जातो.

रवाळ, तपकिरी, काळसर व सेंद्रिय असल्याने वैशिष्ट्यपूर्ण गोडीच गूळ आहे.

बाजारपेठ

तयार झालेला गूळ सुस्थितीत राहण्यासाठी शीतगृहात ठेवून मागणीनुसार होते विक्री.

एक किलोची ढेप ९० रुपये, पाच किलोची ढेप ४०० रुपये, क्यूब्ज प्रति किलो २२० रुपये व गूळ पावडर १८० रुपये असे दर ठेवले आहेत.

पॅकिंग आकर्षक केले आहे.

व्यावयासिक व थेट ग्राहकांना सातारा जिल्ह्यासह पुणे, मुंबई, गुजरात येथे गुळाचे वितरण होते. आसाम, हैदराबाद, तमिळनाडू येथे पोस्टल डिलिव्हरी देखील केली जाते. व्यवसायातील वितरणासाठी चारचाकी वाहन खरेदी केले आहे.

गुळाचा दर्जा कायम ठेवल्याने व सेवाही प्रामाणिकपणे ठेवल्याने मौखिक प्रचारातूनच (माउथ पब्लिसिटी) बाजारपेठ तयार झाली आहे.

गूळ निर्मिती आधीपासून स्वतःच्या शेतातील हळदीपासून पावडर तयार करून त्याचीही विक्री सुरूच होती. त्याचे अर्धा व एक किलोचे पॅकिंग केले जाते. ग्राहकांना कुरिअर, पोस्ट यांच्या माध्यमातून ती सर्वत्र पाठविण्यात येते.

सचिन बाबर ७५८८३८२९५८, ९२२६५०३५०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com