Honey Production : दोघा युवा उद्योजक मित्रांची ‘मधुपुष्प हनी’ निर्मिती

Madhupushp Honey : लहानपणापासूनचे मित्र असलेल्या प्रतीक कर्पे व सतीश शिर्के (जि. सातारा) यांनी शास्त्रीय प्रशिक्षणातून तसेच उद्योजकतेचे गुण आत्मसात करून मध व त्यावर आधारित उत्पादने निर्मिती सुरू केली आहे.
Honey Production
Honey ProductionAgrowon

विकास जाधव
Satara News : लहानपणापासूनचे मित्र असलेल्या प्रतीक कर्पे व सतीश शिर्के (जि. सातारा) यांनी शास्त्रीय प्रशिक्षणातून तसेच उद्योजकतेचे गुण आत्मसात करून मध व त्यावर आधारित उत्पादने निर्मिती सुरू केली आहे. ग्राहकांचे ‘नेटवर्क’, आउटलेट्‌स, फ्रॅंचायसी यांच्याद्वारे आपल्या गुणवत्ताप्राप्त मधाला ‘मधुपुष्प हनी’ या ब्रॅण्डद्वारे आश्‍वासक उलाढीलासह सर्वत्र लोकप्रिय देखील केले आहे.

सातारा जिल्ह्यातील बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील प्रतीक राजेंद्रकुमार कर्पे व कोरेगाव येथील सतीश मुरलीधर शिर्के हे बालपणीचे मित्र आहेत. प्रतीक प्रॉडक्शन इंजिनिअर तर सतीश कृषी पदविकाधारक आहेत. दोघांनी काही काळ नोकरीचा अनुभव घेतला. परंतु शेती वा अन्नप्रक्रिया क्षेत्रात स्वतःचे काही करावे यावर दोघांचे एकमत झाले. त्यासंदर्भात शोध सुरू असताना दोघांनी पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन केंद्राला भेट दिली. तेथे परराज्यातून मधुमक्षिपालन प्रशिक्षणासाठी आलेल्या मधमाशीपालकांची भेट झाली. असा काही अभ्यासक्रम असतो हेच दोघांसाठी नवे होते.आणि हाच दोघांसाठी आयुष्य बदलवणारा क्षण ठरला. येथे दोघांनी सहा महिन्यांच्या निवासी शास्त्रीय प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला.

प्रशिक्षण आणि उद्योगाची सुरुवात
अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केला. पण प्रात्यक्षिक ज्ञान काहीच नव्हते. त्यासाठी विदर्भ, महाबळेश्‍वर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानापर्यंत दोघे फिरले. फुलोरा हंगाम पाहून पेट्या कुठे, कशा ठेवायच्या, मधाचे अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल असे सर्व बारकावे माहीत करून घेण्याबरोबर त्यातील प्रत्यक्ष अनुभवही घेतला. दोघांनीही घरून पैसे घ्यायचे नाहीत असे ठरवले होते. त्यानुसार शासकीय योजनेतून दोनशे मधपेट्या घेतल्या. दहा लाखांची गुंतवणूक त्यासाठी केली. कोल्हापूर, विदर्भ व राजस्थानात जाऊन पेट्या ठेवणे व त्यात मध गोळा करण्यास सुरुवात झाली.

Honey Production
Success Story of Farmer : युवा शेतकरी झाला ‘बनाना चिप्स’ उद्योजक

स्वब्रॅण्डची निर्मिती
संकलित मधाचे पॅकिंग प्रतीक यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या जागी होऊ लागले.
पण मोठ्या कष्टाने तयार केलेल्या मधाला व्यापारी अपेक्षित दर देत नव्हते. काही कंपन्यांकडे माल घेऊन गेले तरी ते जादा मार्जिन मागत. भाव पाडून मागत. बऱ्याच दिवसांनी रक्कम थोडी थोडी करून चुकवत. या व्यवहारात आपल्या हाती फार लागत नाही हे लक्षात आले. आर्थिक विवंचनांनी ते ग्रासून गेले. कर्जाचे हप्ते तर दर महिन्याला चुकवणे सुरू होते. चांगला दर मिळवायचा तर स्वतःचा ब्रॅण्ड घेऊन ‘मार्केट’मध्ये उतरले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यातून २०१७ मध्ये मधुपुष्प हनी हा स्वब्रॅण्ड जन्माला आला. आणि तिथून उद्योगाला मोठी चालना मिळाली.

.

Honey Production
Edible Oil : दोघा युवा मित्रांचा खाद्यतेलनिर्मिती व्यवसाय

..असा आहे आजचा उद्योग (ठळक बाबी)
‘फिल्ड’वरील काम

-सूर्यफूल, तुळस, जांभूळ, ओवा, निलगिरी, जंगलातील विविध फुलांपासून मधनिर्मिती.
त्यासाठी विदर्भ, मध्य प्रदेश, तापोळा, महाबळेश्‍वर, पाचगणी, राजस्थानात मधपेट्या ठेवाव्या लागतात. पूर्वीच्या दोनशे पेट्यांची संख्या आता एकहजारांपर्यंत. शेतकऱ्यांना परागीभवनासाठी त्यांचा उपयोग होतो.
-‘फिल्ड वर्क’साठी १६ कामगार.

उत्पादन व पॅकिंग
-कोरेगावात २०२१ मध्ये तीन हजार चौरस फूट जागेत प्रकिया युनिट. मध साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग व उपपदार्थांची येथे निर्मिती.
-सतीश यांच्याकडे उत्पादन निर्मितीची तर प्रतीक यांच्याकडे मार्केटिंगची जबाबदारी.
--मधापासून गुलकंद, चॉकलेट, जॅम आदींचेही उत्पादन.
- पॅकेजिंगसाठी सहा जण कार्यरत. मधाला मानवी हात लागू नये यासाठी स्वयंचलित सीलिंग व पॅकिंग यंत्रणा. प्रति मिनिटात सहा ते सात बॉटल्स भरल्या जातात.
-२५० ग्रॅम, अर्धा व एक किलो काचेच्या बॉटलमध्ये पॅकिंग. एक किलो मधाची किमान किंमत ६२० रुपये. जांभूळ, तुळशी मधाची किंमत ८५० रु.

‘माकेटिंग’
-कृषी प्रदर्शने, ग्राहक महोत्सवातून मोठ्या प्रमाणात सहभाग. (हंगामात वीस ते पंचवीस प्रदर्शनांतून भाग) त्यातून मोठ्या प्रमाणात ग्राहक नेटवर्क तयार केले.
-वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर येथील हॉटेल्स व अन्य ठिकाणी शनिवार, रविवारी जाऊन तिथे स्टॉल्स भाडेतत्त्वावर घेतले. मधाचे नमुने देऊन त्याची शुद्धता, दर्जा ग्राहकांना पटवून दिली.
-‘ऑरगॅनिक’, ‘शुगर फ्री’, ‘आरोग्यास उपयोगी’, परदेशाप्रमाणे ‘हनी पार्लर’ आदी संकल्पना
राबवल्या.
- मुंबईत विलेपार्ले, लोअर परेल, गोरेगाव, डोंबिवली, तसेच पुणे, शिरवळ, बीड (मराठवाडा) येथे
फ्रॅंजायसी. स्वतःची दोन आउटलेट्‌स. (कोरेगाव, शिरवळ)
-मधुपुष्प नावाने वेबसाइट. त्यावरूनही ‘ऑर्डर्स’ घेतल्या जातात. आयुर्वेदिक डॉक्टरांनाही
औषधे निर्मितीसाठी मधाचा पुरवठा.

उलाढाल

-पाच वर्षांचा तयार झाला अनुभव.
-वर्षाला ३५ ते ४० टन मधनिर्मिती.
- ८० लाख ते एक कोटींपर्यंत उलाढाल.
-हवामानातील विविध बदलांचा फटका या उद्योगाला बसतो. त्यानुसार अर्थकारणातही चढ-उतार.

सन्मान व अन्य यश

-राज्य शासनाचा मधुमित्र पुरस्कार (महाबळेश्‍वर येथे मधमाशीदिनावेळी)
-बारामती येथील कृषी महाविद्यालयाकडून शेतकरी मित्र पुरस्कार.
-सरकारी प्रशिक्षणे कार्यशाळाही प्रतीक, सतीश घेतात. कोरोना काळात डॉक्टरांनी रुग्णांना तुळशीचा मध घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी रुग्णांना तो मोफत पुरवला.
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून प्रदर्शनात स्टॅालला भेट व कौतुक.

प्रतीक कर्पे, ९६६५९७४८५६
सतीश शिर्के, ९५२७४९५७०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com