Zero Tillage Farming: शून्य मशागत तंत्रातून गवसला यशाचा मार्ग
Agriculture Innovation: बुलडाणा जिल्ह्यातील हरिभाऊ येवले, स्वप्नील महाजन, महेश जाधव या प्रगतिशील शेतकऱ्यांनी शून्य मशागत तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीमध्ये प्रगती साधली आहे. उत्पादन खर्च नियंत्रित करून एकरी उत्पादन वाढ मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. आज जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी त्यांचे यश मार्गदर्शक ठरते आहे.