Eggplant Production : दर्जेदार वांगे उत्पादनात हातखंडा

सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथील युवा शेतकरी बाहुबली पाचोरे यांनी वांग्याची अभ्यासपूर्ण शेती केली आहे. सन २०१३ पासून या पिकात सातत्य ठेवत त्यांनी या शेतीत हातखंडा मिळवला आहे.
Eggplant production
Eggplant productionAgrowon

Success Story : सांगली जिल्ह्यात सांगली-पलूस राज्यमार्गावर नांद्रे गाव वसले आहे. गावाच्या अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर कृष्णा नदी आहे. त्यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळते. या गावातील दर्गा देशभरात प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर शर्यतीसाठी लागणारा बैलगाडा तयार करण्याचा कारखाना याच गावात आहे.

त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील शर्यतीचे शौकीन खरेदीसाठी याच गावात येतात. ऊस हे गावचे प्रमुख पीक.

गावातील बाहुबली धन्यकुमार पाचोरे पाचोरे हे युवा शेतकरी. त्यांची दहा एकर शेती आहे. त्यात हंगामी पिकांसह ऊस, भाजीपाला पिकांची लागवड असायची. संपूर्ण शेती वडीलच पाहायचे.

शेतीची जबाबदारी

वडिलांचे २००५ मध्ये निधन झाल्यानंतर शेतीची जबाबदारी पाचोरे बंधूंवर आली. वडिलांनी दिलेल्या शेतीच्या ज्ञानातूनच ते शेती कसू लागले. ऊस आणि हळद ही प्रमुख पिके घेण्यास सुरुवात केली.

शेतीतील अर्थकारण उंचावण्यासह अजून ताज्या उत्पन्नाची गरज भासू लागली. त्यातून नव्या पिकाची गरज लक्षात आली. त्यातून वांगे हे पीक समोर आले. या पिकातील बारकावे, अडचणी, जाणून घेतल्या. सन २०१३ ला एक एकर लागवड केली.

सुरुवातीला पारंपारिक पद्धतीची लागवड होती. पहिल्या प्रयत्नात चांगले यश व दरही अपेक्षित मिळाला. काही वर्षांच्या अनुभवानंतर सन २०१८ च्या सुमारास लागवड तंत्रज्ञानात बदल करण्याची गरज वाटली.

त्यानुसार गादीवाफा पद्धत, पॉलिमल्चिंग यांचा वापर करण्यासह पाच फूट पट्टा पद्धतीचा वापर करण्याचे ठरवले. त्यातून चांगला परिणामही मिळू लागल्याने या व्यवस्थापनात आता सातत्य ठेवले आहे.

Eggplant production
Vegetable Crop damage : टोमॅटो, वांगी उत्पादकांना फटका

व्यवस्थापनातील बाबी

-बाजारपेठेत मागणी असलेल्या वाणाचीच निवड करून त्यात सातत्य ठेवले आहे. बाहुबली सांगतात की कोल्हापूर बाजार समितीत हिरव्या वांग्यास अधिक मागणी असते. वांग्याचा आकार, दर्जा

यांची माहिती तिथेच समजली. बाजारात काहीवेळा दर कमी आला तरी दर्जा कायम ठेवल्याने इतरांपेक्षा दर चांगला मिळतो हे उमगल्यानंतर तशा व्यवस्थापनावर भर दिला.

-एकूण १० एकरांपैकी दरवर्षी वांग्याचे क्षेत्र दोन ते तीन एकर असते. डिसेंबर- जानेवारीमध्ये लागवड केली जाते. या हंगामात लागवडीचे नियोजन असण्याचे कारण म्हणजे उन्हाळ्यात बहुतांश भागात पाण्याची कमतरता असते. त्यामुळे लागवड फारशी होत नाही. त्यामुळे बाजारपेठेत आवक कमी असते. चांगला दर मिळण्याची शक्यता अधिक असते.

-लागवडीनंतर पुढे सुमारे आठ महिने प्लॉट सुरू ठेवण्याचे नियोजन केले जाते.

-लागवडीच्या वेळीस एकरी सात टनांपर्यंत शेणखत, दोन पोती डीएपी, प्रत्येकी एक पोते पोटॅश व अमोनिअम सल्फेट, सिलिकॉन, निंबोळी पेंड चार बॅग असा डोस दिला जातो.

-जमीन सुपीकतेवर अधिक भर दिला आहे. शेणस्लरी व गोमूत्र यांची

निर्मिती करून एकरी दोन बॅरेल यांचा दर १० दिवसांनी वापर केला जातो. दरवर्षी लागवडीचे क्षेत्र बदलण्यात येते. थोडक्यात, फेरपालट केली जाते.

-एक ते दीड दीड फूट उंचीचा गादीवाफा (बेड) असतो. मल्चिंग पेपर वापरल्याने पाण्याचे बाप्षीभवन होत नाही. तणांचा प्रादुर्भावही कमी असतो.

Eggplant production
Pomato : एकाच झाडावर टोमॅटो, वांगी आणि बटाटेही

-एका बेडवर दोन ओळी असतात. झिगझॅग पद्धतीने लागवड होते. एकरी सुमारे ३५०० रोपे असतात. रोपे खात्रीशीर नर्सरीमधून आणली जातात.

-पाच फुटी सरी ठेवल्याने रोपांच्या वाढीस चांगली जागा मिळते. वाफसा पद्धतीने पाणी नियोजन करता येते. वांगी तोडणी सोपी होते. आंतरमशागत, खते, फवारणी आणि मजुरीत चांगल्या प्रकारे बचत होते. पट्ट्यातून फवारणीसाठी ब्लेअर चालवणे शक्य होते.

-डबल लॅटरल पद्धतीचे ठिबक असून, प्रति तासाला चार लिटर पाण्याचा विसर्ग केला जातो. एक दिवसाला आड या पद्धतीने सुरुवातीच्या काळात तर फळे लागण्याच्या वेळेस तासाचा कालावधी वाढवला जातो.

प्रतवारी, उत्पादन व विक्री

वांग्याची दररोज काढणी केली जाते. प्रति तोड्यास ४०० किलोपर्यंत वांगी उपलब्ध होतात. वांग्याची तीन प्रकारे म्हणजे लहान, मध्यम व मोठे (भरतासाठीचे) अशी प्रतवारी केली जाते. लहान वांग्याला सर्वांत जास्त मागणी व दरही असतात. प्रति किलो ३० ते ३५ रुपये त्याचा दर राहतो.

घरगुती ग्राहकांकडून त्यास जास्त पसंती असते. मध्यम आकाराच्या वांग्यांना हॉटेल वा खाणावळी व्यावसायिकांकडून मागणी असते. त्यास २० रुपये दर असतो. तर मोठ्या वांग्यांना मागणी कमी राहून दर १० रुपये असतो.

प्रतवारीनंतर २७ किलोच्या बॉक्स पॅकिंगमधून कोल्हापूर येथील बाजार समितीत वांगी विक्रीस पाठवली जातात. गावातील अन्य भाजीपाला उत्पादकांच्या शेतीमालासोबत हा माल रवाना होतो. एकरी उत्पादन २५ ते २८ टनांपर्यंत मिळते.

उत्पादन खर्च दोन लाख रुपयांपर्यंत येतो. वर्षभर तोडणी सुरू असल्याने ताजे उत्पन्न मिळत राहते व दैनंदिन खर्च भागवता येतात असे या पिकाचे आपल्यासाठी महत्त्व असल्याचे बाहुबली यांनी सांगितले.

बाहुबली पाचोरे, ९९२१७६७१६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com