Agriculture Technology: मजुरी, वेळेत बचत करणारे ऊसतोडणी यंत्र
Agriculture Innovation: सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील कुंभारी येथील संशोधक शेतकरी दाजी पाटील यांनी शेतीतील समस्या ओळखून व अथक परिश्रमातून छोटी, मोठी यंत्रे विकसित केली आहेत. अलीकडील काळातच त्यांनी ऊस लागवडीच्या यंत्रासह ऊस तोडणीचेही यंत्र विकसित केले आहे. त्यातून मजुरी, वेळ, पैसा यांची बचत होऊन शेतकऱ्यांसाठी हे यंत्र मोलाचे ठरणार असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.