Success Story : मसाल्यांना अस्सल कोल्हापुरी स्वाद देणारी उद्योजक ‘दुर्गा’

Masala Udyog : कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा बहिरेवाडी (ता. पन्‍हाळा) येथील सरिता मारुती करंबळकर यांनी आवडीतून तीन- चार वर्षांपूर्वी घरगुती स्वरूपात मसाले निर्मिती सुरू केली. त्यांना मिळणारा प्रतिसाद व मागणी पाहून दीड वर्षापूर्वी कंपनी सुरू करून ‘साक्षीज’ मसाले सादर केले आहेत. अस्सल कोल्हापुरी स्वादाचे हे मसाले बाजारपेठेत यशस्वी करण्याची या उद्योजक ‘दुर्गे’ची धडपड यशस्वी ठरली आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

Food Processing : कोल्‍हापूर जिल्‍ह्यात वारणा नदीकाठच्या गावांनी शेती व दुग्ध व्यवसायात समृद्धी मिळविली आहे. पन्हाळा तालुक्यात येणाऱ्या यापैकीच वारणा बहिरेवाडी (कोडोली) गावात सरिता मारुती करंबळकर राहतात. तालुक्यातील जाफळे हे त्यांचे माहेर. वाहतूक व्यवसायात असलेले मारुती यांच्याशी तेवीस वर्षांपूर्वी त्‍यांचा विवाह झाला.

पतीच्या व्‍यवसायातून चांगली अर्थप्राप्‍ती होत असल्याने अन्य व्‍यवसायांकडे वळण्याची त्या वेळी फारशी गरज भासली नाही. सरिता शिलाई काम करायच्या. पण स्वयंपाकात त्यांचा चांगला हात होता. विविध मसाले तयार करण्याची त्यांना खूप आवड होती. आवडीला व्यावसायिक रूप दिल्यास आपल्या कौशल्याचे चीज होईल, उद्योजिका म्हणून ओळख तयार होईल व घरचे अर्थशास्त्रही उंचावेल असे त्यांना वाटले.

Food Processing
Success story : कोरफड, आवळासहित सत्तावीस ‘ज्यूसेस’ निर्मितीचा उद्योग

घरगुती स्वरूपाचा उद्योग

सुमारे तीन- चार वर्षांपूर्वी घरगुती स्वरूपात चिकन, मटण, बिर्याणी, गरम मसाला आदी उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. परिचितांना तसेच जिथे आपण माल खरेदी करतो ती दुकाने, मॉल व हॉटेल व्यावसायिकांना प्लॅस्टिक पिशव्यांमधून आपली ‘नॉन ब्रॅण्डिंग’ उत्पादने त्या देऊ लागल्या.

गुणवत्ता व स्वाद या बळावर उत्पादनांना विशेषतः हॉटेल व्यावसायिकांकडून मोठी मागणी येऊ लागली. उत्‍साह वाढला. केवळ घरगुती स्वरूपापुरते मर्यादित न राहता कंपनी स्थापन करून व्‍यावसायिक स्तरावर निर्मितीचे धाडस करावे असे सरिता यांना वाटले.

Food Processing
Ginger Crop Success Story : शेतीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या भावाचं 'असं' फेडलं ऋण

पतीच्या होकाराने मनोबल उंचावले

सरिता यांनीही पती मारुती यांना व्यवसायात सहभागी करून घ्यायचे ठरवले. वाहतुकीचा व्यवसाय असल्याने मारुती यांना वितरण, मार्केटिंग या बाबी सुकर होणाऱ्या होत्या. त्यांनीही आपला व्यवसाय सोडून पत्नीच्याच उद्योगासाठी पूर्णवेळ काम करण्याची तयारी दर्शविली. ही बाब सरिता यांच्यासाठी आनंददायी व मनोबल वाढविणारी होती. दोघांनी मिळून मग कोडोली येथे चार गुंठे क्षेत्र भाडेतत्त्वावर घेतले. तेथे सुमारे दीड वर्षापूर्वी उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.

आज मसाले उत्पादन निर्मिती व गुणवत्ता या जबाबदाऱ्या सरिता सांभाळतात. तर मार्केटिंग व वाहतूक या बाबींकडे मारुती लक्ष देतात. मुलगा साहिल ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’च्या दुसऱ्या वर्षाला तर मुलगी बारावील विज्ञान शाखेत शिकते आहे. मुलीच्या नावावरूनच ‘साक्षीज रसोई’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे.

Food Processing
Ginger Crop Success Story : शेतीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या भावाचं 'असं' फेडलं ऋण

गुणवत्ता जपल्यानेच मार्केट मिळाले (इन्फो)

सरिता सांगतात, की घरगुती पद्धतीनेच उत्पादने तयार करते. प्रत्येकाची चाचणी घेते. ग्राहकांना मसाला आवडलाच पाहिजे, त्यांना पदार्थ खाताना त्रास होणार नाही हा दृष्टिकोन असतो. रासायनिक घटक त्यात समाविष्ट केले जात नाहीत. प्रयोगशाळेत उत्पादनांची तपासणी होते. म्हणूनच अस्सल कोल्हापुरी स्वादाच्या आमच्या उत्पादनांना कायम मागणी असते.

‘माविम’चे सहकार्य (इन्फो)

महिला आर्थिक विकास महामंडळाचे (माविम) जिल्‍हा समन्वयक अधिकारी सचिन कांबळे व सहकाऱ्यांचे सहकार्य सरिता यांना लाभते. महामंडळातर्फे होणाऱ्या वार्षिक सभा, विविध प्रदर्शनांत

सरिता भाग घेतात. माविमने सव्वाशे व्यावसायिकांची यादी तयार केली आहे. त्याद्वारे बाजारपेठ मिळवणे सरिता यांना शक्य झाले. त्यांनी २०२० मध्ये बचत गटाची स्थापनाही केली आहे. त्यातून महिलांचे संघटन केले आहे. सरिता यांना उद्योगासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत दहा लाखांचे कर्ज व ‘माविम’ कडून पाच लाख रुपये अर्थसाह्य मिळाले आहे.

सरिता करंबळकर, ९६७३८७५६१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com