sandeep Shirguppe
सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी खटाव तालुक्यातील भोसरे गावातला एका सर्वसामान्य शेतकऱ्याने आले पिकात भरघोस उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
दुष्काळी भागातील खटाव तालुक्यात प्रचंड मेहनत घेत आले पीक लावण्याचे भिमराव रामचंद्र जाधव यांनी ठरवलं.
आले पिकाला चांगला दरही मिळत होता परंतु काही व्यापाऱ्यांच्या आडमुठे पणामुळे आल्याचा दर पाडण्याचा घाट घातला होता.
यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सातारा जिल्ह्यात व्यापाऱ्याविरोधात तीव्र लढा उभारण्यात आला. अन् व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणे हाणून पाडलं.
बाजारपेठेतील दलालांच्या मनमानीविरोधात लढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लाखो आले उत्पादकाना न्याय मिळवून दिला आहे.
त्यापैकीच एक भिमराव जाधव आहेत. भिमराव शेतीत प्रचंड कष्ट करूनही त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागायचा परंतु त्यांच्या भावाने मोठी साथ दिली.
शेतीला भांडवल पुरवणाऱ्या मोठ्या भावाला शेतीमध्ये चांगल उत्पन्न घेऊन चारचाकी घेऊन द्यायच हे स्वप्न उराशी बाळगून भिमराव यांनी आले पिकातून मोठे उत्पादन घेतले.
दरम्यान भिमराव यांना आले पिकातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी भावाला गाडी भेट दिली आहे. याची सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान आले पिकाला उच्चांकी दर मिळवून देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मोठा लढा उभारण्यात आला होता. यामुळे व्यापाऱ्यांनी नमती भूमिका घेतली होती.
आले पिकाला चांगला दर आल्याने जाधव यांनी नवी कोरी गाडी घेता आल्याचे समाधान मिळाले अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. हा प्रसंग गावकरी आणि जाधव कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू उभा करणारा ठरला.
भिमराव रामचंद्र जाधव यांनी गावकऱ्यांच्यासमोरच आपल्या भावाला गाडी प्रदान केली.